Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
News

महाविकास आघाडीचे २१५ उमेदवार निश्चित! काँग्रेसला ८४ तर शरद पवार गट व उद्धवसेनेला किती? वाचा सविस्तर..

मुंबई | महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांचा जागा वाटपाचा प्रश्न बहुतांशी ठिकाणी मार्गी लागला आहे. सध्या २१५ जागांवर महायुतीतील घटक पक्षांचे एकमत झाले आहे. उर्वरित ७३ जागांचे वाटपही येत्या तीन दिवसात अंतिम होईल, असे सांगण्यात येत आहे.

निश्चित झालेल्या जागांपैकी यामध्ये काँग्रेसला ८४, तर शरद पवार गट आणि उद्धवसेनेला प्रत्येकी ६५ जागा देण्यात आल्या आहेत. तर एक जागा सपाच्या अबू आझमी यांची अंतिम करण्यात आली आहे. या २१५ जागा सर्व सहमतीने अंतिम करण्यात आल्या आहेत, असे काँग्रेसमधील एका नेत्याने खाजगी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले आहे. उर्वरित ७३ जागीदेखील मित्र पक्षांसह आघाडीतील तीन प्रमुख पक्षांच्याही जागा असतील. या सर्व जागा वाटपात सध्याच्या घडीला सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळतील, असे चित्र आहे.

आज बुधवारी दिल्लीत काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक होत आहे. त्यानंतर दोन दिवसांच्या आत ३० लोकांची पहिली यादी काँग्रेसकडून जाहीर केली जाणार आहे. दिल्लीत होणाऱ्या बैठकीसाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, मधुसूदन मिस्त्री यांच्यासोबत रमेश चेन्नीथला, महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड उपस्थित राहणार आहेत. 

विदर्भात काँग्रेससाठी, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी, तर मराठवाड्यात ठाकरे यांच्या शिवसेना आणि काँग्रेससाठी जास्त जागा देण्यात आल्या आहेत. मुंबई आणि कोकणात उद्धवसेनेला इतर दोन पक्षांच्या तुलनेत जास्त जागा देण्यात येतील, असेही काँग्रेसच्या नेत्याने स्पष्ट केले आहे. 

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा