Career

श्री साईबाबा संस्थान भरती 2026 : 31 पदांसाठी भरती; 6 जुलैपर्यंत ऑफलाईन अर्जाची संधी | Shri Saibaba Sansthan Bharti 2026

Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi has announced recruitment for 31 specialist and medical officer posts. Eligible candidates can apply through offline mode till July 6, 2026.

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था अंतर्गत कार्यरत असलेल्या श्री साईबाबा आणि साईनाथ हॉस्पिटलमध्ये विविध वैद्यकीय पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी भरती (Shri Saibaba Sansthan Bharti 2026) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत कान-नाक-घसा (ENT) शल्यचिकित्सक, वरिष्ठ भूलतज्ज्ञ, वरिष्ठ अतिदक्षता विभाग तज्ज्ञ (इंटेंसिव्हिस्ट), वरिष्ठ रेडिओलॉजिस्ट, बालरोगतज्ज्ञ, कनिष्ठ भूलतज्ज्ञ, आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी (CMO) तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांनी निर्धारित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 6 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे.

भरतीची महत्त्वाची माहिती : Shri Saibaba Sansthan Bharti 2026

बाबतपशील
संस्थेचे नावश्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी)
पदांची संख्या31 जागा
नोकरीचे ठिकाणअहिल्यानगर
अर्ज पद्धतीऑफलाईन
अर्जाची अंतिम तारीख06 जुलै 2026
अर्ज पाठविण्याचा पत्तासामान्य प्रशासन विभाग (आवक विभाग), श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर – 423109

पदनिहाय शैक्षणिक पात्रता

कान-नाक-घसा (ENT) शल्यचिकित्सक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस पदवी तसेच एम.एस. (ENT) किंवा डीएनबी (ENT) अथवा सीपीएस/एफसीपीएस पात्रता आवश्यक आहे. वरिष्ठ भूलतज्ज्ञ पदासाठी एमबीबीएससह एमडी, डीएनबी, एफसीपीएस किंवा भूलतज्ज्ञ विषयातील डिप्लोमा आवश्यक आहे.

वरिष्ठ अतिदक्षता विभाग तज्ज्ञ (इंटेंसिव्हिस्ट) पदासाठी एमबीबीएससह अ‍ॅनेस्थेशिया, मेडिसिन किंवा पल्मोनोलॉजी विषयातील एमडी किंवा डीएनबी पात्रता अपेक्षित आहे. वरिष्ठ रेडिओलॉजिस्ट पदासाठी एमडी रेडिओलॉजी किंवा समकक्ष पात्रता आवश्यक आहे.

बालरोगतज्ज्ञ पदासाठी एमडी, डीएनबी किंवा एफसीपीएस (पेडियाट्रिक्स) आवश्यक असून कनिष्ठ भूलतज्ज्ञ पदासाठी एमडी, डीएनबी किंवा संबंधित डिप्लोमा आवश्यक आहे. तर आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी (CMO) आणि निवासी वैद्यकीय अधिकारी (RMO) पदांसाठी एमबीबीएस पदवी आवश्यक असून उच्च शैक्षणिक पात्रता किंवा विशेष अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाऊ शकते.

सर्व पदांसाठी उमेदवारांनी एमएस-सीआयटी परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

वेतनश्रेणी

पदवेतन
ENT शल्यचिकित्सक₹88,000 + संस्थेच्या नियमानुसार प्रोत्साहनपर रक्कम
वरिष्ठ भूलतज्ज्ञ₹88,000 + प्रोत्साहनपर रक्कम
वरिष्ठ इंटेंसिव्हिस्ट₹88,000 + प्रोत्साहनपर रक्कम
वरिष्ठ रेडिओलॉजिस्ट₹88,000 + प्रोत्साहनपर रक्कम
बालरोगतज्ज्ञ₹88,000 + प्रोत्साहनपर रक्कम
कनिष्ठ भूलतज्ज्ञ₹72,900 + प्रोत्साहनपर रक्कम
CMO₹72,900
RMO₹72,900

अर्ज कसा करावा?

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्ज ऑफलाईन स्वरूपात भरून आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अंतिम तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी 6 जुलै 2026 पूर्वी अर्ज सादर करावा.

भरती प्रक्रियेविषयी अधिक माहिती, पात्रतेचे सविस्तर निकष आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती अधिकृत जाहिरातीत उपलब्ध आहे.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/HwElR
अधिकृत वेबसाईटhttps://www.sai.org.in/

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा