Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
नोकरी

पदवीधरांनो शेवटची संधी..! बँक ऑफ बडोदा येथे 2871 पदांची भरती, आजच अर्ज करा | Bank of Baroda Bharti 2025

Bank of Baroda Bharti 2025: बँकिंग क्षेत्रात कारकीर्द घडवण्याची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी समोर आली आहे. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda – BOB) या देशातील अग्रगण्य बँकेने “स्थानिक बँक अधिकारी” (Local Bank Officer) या पदासाठी एकूण 2500 रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची निवड विविध राज्यांमध्ये करण्यात येणार असून महाराष्ट्रात एकट्या 485 जागा रिक्त आहेत. याशिवाय गुजरातमध्ये सर्वाधिक 1160 पदे, कर्नाटकमध्ये 450 पदे, आणि इतर अनेक राज्यांमध्ये भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता म्हणून उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (Graduate) असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे दरम्यान आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार वयामध्ये सवलत मिळेल.

अर्ज शुल्काबाबत बोलायचं झालं, तर सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹850 (जीएसटीसह) इतके आहे, तर SC, ST, महिला आणि अपंग उमेदवारांसाठी ₹175 (जीएसटीसह) शुल्क आहे. याशिवाय पेमेंट गेटवे शुल्क स्वतंत्र राहील.

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹48,480 ते ₹85,920 इतके वेतन मिळेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 ऑगस्ट 2025 असून त्याआधी अर्ज पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. अधिकृत अर्ज आणि सविस्तर माहितीकरिता https://www.bankofbaroda.in/ या बँकेच्या वेबसाईटला भेट द्यावी. तसेच उमेदवारांनी मूळ PDF जाहिरात वाचून सविस्तर माहिती समजून घ्यावी.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/O17kI
शुद्धिपत्रकhttps://shorturl.at/jnLQN
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/Qcqaa
अधिकृत वेबसाईटhttps://www.bankofbaroda.in/

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker