Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
News

कोल्हापूर: वारणा नदीच्या पुलावरून कार कोसळली; जीपीएस प्रणालीवरुन धक्कादायक घटना उघडकीस | Car fell into Warna River

कोल्हापूर | पुणे -बंगळूरू महामार्गावर असणाऱ्या वारणा नदीच्या पुलावरुन पुलाचा कठडा तोडून कार थेट नदीत कोसळल्याची (Car fell into Warna River) घटना समोर आली आहे. जीपीएस प्रणालीवरुन ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून कारमधून किती लोक प्रवास करत होते याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली असून आज गुरूवारी दुपारी उघडकीस आली आहे. सध्या नदीमधून कार बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

कोल्हापुरहून पुण्याच्या दिशेला जाणारी कार बुधवारी मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास किणी टोल नाका (ता. हातकणंगले) जवळील वारणा नदीच्या पुलावर आली असता ती पुलाच्या सुरुवातीलाच कठडा तोडून थेट नदीत कोसळली. कारचालक व त्यामधील व्यक्ती नियोजित स्थळी न पोहचल्याने गुरुवारी सकाळपासूनच त्यांची शोधाशोध सुरु होती.

जीपीएस प्रणालीद्वारे त्यांचा शोध घेतला असता वारणा नदीवरील पुलावर त्यांचे शेवटचे लोकेशन दाखवण्यात आले. त्यामुळे पेठवडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चार तरुणांनी नदीत शोधाशोध केली असता कार आढळून आली. सध्या ही कार नदीपात्राबाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा