Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
News

टोल नाही, टोला द्या.. पुणे कोल्हापूर मार्गावरील टोलविरोधात काँग्रेस आक्रमक; चार टोलनाक्यांवर आंदोलन

कोल्हापूरमध्ये काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

कोल्हापूर | पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रुंदीकणाचे काम सुरु आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडल्यामुळे प्रवासाला बराच वेळ लागत आहे. खराब रस्ते असूनही टोल वसूल केला जात आहे. रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफ व्हावा, या मागणीसाठी आणि महामार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात काँग्रेसने आज आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले. हे आंदोलन पुणे ते कोल्हापूर या मार्गावर चार ठिकाणच्या टोल नाक्यावर केले जात आहे.

काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजता राष्ट्रीय महामार्गावरील किणी येथील टोलनाक्यावर हे आंदोलन करण्यात आले. पुणे पासून कागल -कोगनोळी या महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची सध्या कमालाची दुरवस्था झाली आहे. वाहनधारकांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे टोल आकारणीचा हक्क गमावला आहे, अशी भूमिका घेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी टोल नाक्यांवर टोल आकारणीस विरोध केला. महामार्गावर जमलेली सर्व वाहने टोलची रक्कम न घेता सोडावीत, असा आग्रह यावेळी धरण्यात आला.

\"\"

पश्चिम महाराष्ट्रात टोल विरोधी आंदोलन किणी, आणेवाडी, तासवडे, खेड शिवापुर या चार टोल नाक्यांवर सुरू झाले असून आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार संग्राम थोपटे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजुबाबा आवळे, आमदार जयश्री जाधव ,आमदार जयंत आसगावकर, राहुल (पी.एन.)पाटील, संजय जगताप, विक्रम सावंत यांच्यासह काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा