Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
बाजारभाव

Gold Rate | Silver Rate : सोने चांदीचे दरात मोठी उलथापालथ; जाणून घ्या आजचे 18, 22, 23 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर!

Gold Rate | Silver Rate : आज भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. एका दिवसात सोन्याच्या दरात तोळ्यामागे 2,883 रुपयांची वाढ झाली असून चांदीच्या दरात तब्बल 14,475 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. या वाढीमुळे सोने आणि चांदी दोन्हीने आतापर्यंतचे उच्चांक मोडले आहेत.

आज चांदीचा जीएसटीशिवायचा दर 2,57,283 रुपये प्रति किलो इतका असून जीएसटीसह चांदीचा दर 2,65,001 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. शुक्रवारी चांदीचा दर 2,42,808 रुपये प्रति किलो होता. याआधी 7 जानेवारी रोजी चांदीने 2,48,000 रुपयांचा उच्चांक गाठला होता, जो आज मोडला गेला आहे.

सोन्याच्या बाबतीतही अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. आज जीएसटीशिवाय 24 कॅरेट सोन्याचा दर 1,40,005 रुपये प्रति तोळा इतका झाला असून जीएसटीसह हा दर 1,44,205 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला आहे. शुक्रवारी सोन्याचा दर 1,37,122 रुपये प्रति तोळा होता. याआधी जीएसटीशिवाय सोन्याचा उच्चांक 1,38,181 रुपये होता, जो आज पार करण्यात आला आहे.

फक्त 24 कॅरेटच नव्हे तर इतर कॅरेटच्या सोन्याच्या दरातही लक्षणीय वाढ झाली आहे. 23 कॅरेट सोन्याच्या दरात 2,871 रुपयांची वाढ होऊन आज दर 1,39,444 रुपये प्रति तोळा इतका झाला आहे. जीएसटीसह 23 कॅरेट सोन्याचा दर 1,43,627 रुपये प्रति तोळा आहे.

22 कॅरेट सोन्याच्या दरात 2,641 रुपयांची वाढ झाली असून आज एक तोळे सोने 1,28,245 रुपयांवर पोहोचले आहे. जीएसटीसह 22 कॅरेट सोन्याचा दर 1,32,092 रुपये प्रति तोळा इतका आहे. याशिवाय 18 कॅरेट सोन्याचा दर 1,05,004 रुपये प्रति तोळा असून जीएसटीसह हा दर 1,08,154 रुपये आहे. 14 कॅरेट सोन्याच्या दरातही 1,687 रुपयांची वाढ झाली असून आज त्याचा दर 81,903 रुपये प्रति तोळा आहे.

आजचे प्रमुख दर (जीएसटीशिवाय):

धातू / कॅरेटदर
सोने 24 कॅरेट₹1,40,005 प्रति तोळा
सोने 23 कॅरेट₹1,39,444 प्रति तोळा
सोने 22 कॅरेट₹1,28,245 प्रति तोळा
सोने 18 कॅरेट₹1,05,004 प्रति तोळा
चांदी₹2,57,283 प्रति किलो

दरवाढीमागची कारणेGold Rate | Silver Rate

सोने आणि चांदीच्या दरात झालेल्या वाढीमागे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय घटक कारणीभूत आहेत. 2025 या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या दरात सुमारे 65 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने नवा उच्चांक गाठत 4,600 डॉलर प्रति औंसचा टप्पा ओलांडला आहे, तर चांदीचा दर 84.5 डॉलर प्रति औंस इतका झाला आहे.

जागतिक पातळीवर सुरू असलेल्या भूराजकीय संघर्षांमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीकडे वळताना दिसत आहेत. याशिवाय अमेरिकेत व्याजदर कपातीची शक्यता आणि डॉलरमध्ये आलेली नरमाई यामुळेही मौल्यवान धातूंना आधार मिळत आहे.

चांदीच्या दरवाढीमागे औद्योगिक कारणे महत्त्वाची ठरत आहेत. सौर ऊर्जा प्रकल्प आणि इलेक्ट्रिक वाहन उद्योगात चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने मागणी वाढली आहे. परिणामी चांदीच्या दरावर सतत वरचा दबाव दिसून येत आहे.

दरम्यान, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) कडून देशभरासाठी सोने आणि चांदीचे दर जाहीर केले जातात. हे दर जीएसटी आणि मेकिंग चार्जेसशिवायचे असतात आणि दिवसातून दोन वेळा प्रसिद्ध केले जातात. त्यामुळे प्रत्यक्ष खरेदी करताना दरात फरक पडू शकतो.

टीप – शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि कमोडिटी मार्केट हे जोखमीच्या अधीन असतात. वरील माहिती केवळ प्राथमिक स्वरूपाची असून कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा