Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
नोकरी

महाराष्ट्रात भारतीय डाक विभागात 3553 पदांसाठी मोठी भरती, संधी चुकवू नका; त्वरित अर्ज करा | Indian Post GDS Bharti 2026

Massive India Post recruitment announced for Maharashtra with 3,553 vacancies.

Indian Post GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागामार्फत महाराष्ट्र राज्यातील विविध आस्थापनांवर ३५५३ पदांची मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील तसेच शहरांमधील युवक-युवतींसाठी ही भरती महत्त्वाची संधी मानली जात आहे. या भरती अंतर्गत ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्टमास्टर (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

ही भरती संपूर्ण महाराष्ट्रातील तब्बल ४६ विभागांमध्ये राबविण्यात येणार असून, ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांतील उमेदवारांना यामध्ये संधी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण डाक सेवक पदासाठी ही भरती अत्यंत लोकप्रिय असून, स्थानिक पातळीवर सरकारी नोकरीची संधी मिळवून देणारी आहे.

विभागनिहाय जागांचा तपशील – Indian Post GDS Bharti 2026

महाराष्ट्रातील विविध विभागांतील जाहीर जागांचा तपशील

अ.क्र.विभागाचे नावजागा
1अहिल्यानगर विभाग73
2अकोला विभाग105
3अमरावती विभाग132
4बारामती विभाग65
5बीड विभाग74
6भुसावळ विभाग63
7बुलढाणा विभाग48
8चंद्रपूर विभाग325
9छत्रपती संभाजीनगर विभाग99
10धाराशिव विभाग84
11धुळे विभाग133
12गोवा विभाग92
13जळगाव विभाग64
14कराड विभाग86
15कोल्हापूर विभाग108
16मालेगाव विभाग80
17मुंबई शहर (पूर्व) विभाग3
18मुंबई शहर (उत्तर) विभाग5
19मुंबई शहर (उत्तर-पूर्व) विभाग10
20मुंबई शहर (उत्तर-पश्चिम) विभाग18
21मुंबई शहर (दक्षिण) विभाग1
22मुंबई शहर (पश्चिम) विभाग4
23मुंबई जीपीओ विभाग1
24नागपूर शहर विभाग8
25नागपूर म्युफसिल विभाग305
26नांदेड विभाग58
27नाशिक विभाग52
28नवी मुंबई विभाग49
29पालघर विभाग81
30पंढरपूर विभाग61
31परभणी विभाग49
32पुणे शहर (पश्चिम) विभाग30
33पुणे शहर (पूर्व) विभाग12
34पुणे म्युफसिल विभाग131
35रायगड विभाग136
36रत्नागिरी विभाग218
37मिरज (RMS BM DN)4
38भुसावळ (RMS L DN)1
39सांगली विभाग114
40सातारा विभाग84
41श्रीरामपूर विभाग74
42सिंधुदुर्ग विभाग100
43सोलापूर विभाग67
44ठाणे विभाग70
45वर्धा विभाग83
46यवतमाळ विभाग93
एकूण3553

शैक्षणिक पात्रता व निवड प्रक्रिया

या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक डाऊनलोड करून वाचन करणे अत्यावश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेसोबतच वयोमर्यादा, आरक्षण, गुणवत्ता यादी (मेरिट लिस्ट) याबाबतची सविस्तर माहिती जाहिरातीत देण्यात आलेली आहे. बहुतांश पदांसाठी लेखी परीक्षा न घेता शैक्षणिक गुणांच्या आधारे निवड केली जाते, ही बाब उमेदवारांसाठी दिलासादायक मानली जात आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ फेब्रुवारी २०२६ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला दिला जात आहे. अर्ज प्रक्रियेदरम्यान कोणतीही चूक होऊ नये यासाठी अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती स्थिरता, सामाजिक प्रतिष्ठा आणि दीर्घकालीन करिअर देणारी ठरू शकते. त्यामुळे पात्र उमेदवारांनी ही संधी दवडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

Indian Post Bharti 2026 – जाहिरात पाहा

Indian Post GDS Bharti 2026 – ऑनलाईन अर्ज करा

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा