Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
बातम्या

\’जनसुराज्य\’च्या विनय कोरेंनी विधानसभेसाठी महायुतीवर वाढवला दबाव; कोल्हापूरसह राज्यात केली \’इतक्या\’ जागांची मागणी | Vinay Kore

कोल्हापूर | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्ष अॅक्शन मोड आल्याचे पहायला मिळत आहे. महायुतीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये (Mayayuti) जागावाटपावरून तणतण सुरू असतानाच आता महायुतीला पाठिंबा दिलेल्या छोट्या घटक पक्षांनी सुद्धा जागा वाटपामध्ये अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबाव वाढवण्यास सुरूवात केली आहे.

महायुतीला पाठिंबा दिलेले, कोल्हापुरातील जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे (Vinay Kore) यांनी आगामी विधानसभेसाठी 12 ते 15 जागा लढवण्याची घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी 12 ते 15 जागांची मागणी करणार असल्याचे एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे. आमदार कोरे यांनी 2019 पासून महायुतीला पाठिंबा दिला आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार विनय कोरेंची रणनीती

राज्यामध्ये विनय कोरे यांनी विधानसभेसाठी 12 ते 15 जागांची मागणी केली आहे. यापैकी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा पैकी चार जागा मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. आमदार कोरे यासाठी येत्या दोन दिवसांमध्ये पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती निश्चित करणार आहेत. सध्या विनय कोरे शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांची वारणा खोऱ्यासह जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात मोठी ताकद आहे. 

आमदार कोरे यांचे राजकीय नेतृत्व सहकार चळवळीतून पुढे आलेले आहे. त्यांचा‘वारणा’ ब्रँड प्रसिद्ध आहे. विनय कोरे लिंगायत समाजाचे असल्याने लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या सोलापूर, सांगली, कोल्हापूर, लातूर, नांदेड या राज्याच्या सीमावर्ती जिल्ह्यांत जनसुराज्य पक्षाला चांगला जनाधार आहे.

जनसुराज्यची सांगलीत दोन जागांची मागणी 

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील जत व मिरज विधानसभेच्या जागेची भाजपकडे मागणी करणार असल्याचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी म्हटले आहे. मिरजेत शिवसेना (शिंदेसेना) व पीपल्स रिपब्लिकन पार्टीसोबत आता जनसुराज्य या मित्रपक्षानेही मिरज विधानसभेच्या जागेवर दावा केला आहे. सध्या या मतदार संघात सुरेश खाडे आमदार आहेत. जनसुराज्य पक्षानेही याठिकाणी उमेदवारीची मागणी केल्याने, प्रत्यक्ष महायुतीच्या जागावाटपात मात्र याठिकाणी मोठ्या घडामोडी घडणार आहेत.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker