Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
नोकरी

कोल्हापूर जिल्ह्यातील तरूणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; 19 ऑगस्ट रोजी नोकरीसाठी ‘या’ ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन! Kolhapur Job News

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील नोकरीच्या (Kolhapur Job) शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय कोडोली ता.पन्हाळा यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा रोजगार मेळावा मंगळवार दि. 19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यासाठी यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालय, कोडोली, ता. पन्हाळा येथे उपस्थित राहून या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील 13 खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून, त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे 703 पेक्षा जास्त रिक्तपदे या मेळाव्याकरीता कळविण्यात आली आहेत. या पदांकरीता किमान 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदव्युत्तर पदवी, ‍अभियांत्रिकी पदवी, आय.टी.आय. इत्यादी पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व ‍शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार रिझ्युमच्या 3 प्रती सोबत आणणे आवश्यक आहे.  

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker