नोकरी

पाहिजेत: कोल्हापूरात ‘या’ विविध ठिकाणी नोकरीच्या भरपूर संधी; नवीन जाहिराती प्रकाशित, नोकरी सर्वांसाठी | Kolhapur Jobs 2025

Kolhapur Jobs 2025 | कोल्हापूर जिल्ह्यात नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी खालील ठिकाणी नोकरीच्या विविध संधी उपलब्ध आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या माहितीची पडताळणी करून नोकरीसाठी अर्ज करावेत, किंवा प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहावे. तसेच तुमच्या संबंधित इतरांनाही नोकरीची आवश्यकता असल्यास ही माहिती अवश्य शेअर करावी.

न्यू कॉलेज कोल्हापूर येथे डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन या पदासाठी रिक्त जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी शिवाजी विद्यापिठाच्या वेबसाईटला भेट देऊन सर्व तपशील जाणून घेऊन अर्ज करावा.

आरो मेटालिक्स यांना त्यांच्या शिरोली आणि कागल एमआयडीसीतील युनिटसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. ऑफिस असिस्टंट, कास्टिंग इन्सपेक्टर तसेच स्पेक्ट्रो लॅब टेक्निशिअन अशा पदांसाठी याठिकाणी भरती केली जाणार आहे. यासाठी फ्रेशर्स, अनुभवी उमेदवार पात्र आहेत. इच्छूकांनी arrow_metalliks@yahoo.co.in या मेल आयडीवर आपला बायोडेटा पाठवावा.

125 कोटी उलाढाल असलेल्या कोल्हापूर शहरातील अग्रगण्य सहकारी पतसंस्थेत अकाऊंटट पदासाठी उमेदवाराची आवश्यकता आहे. एमकॉम. जीडीसी अँड ए शिक्षण असणे गरजेचे आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी पी.1361 दै. पुढारी, भाऊसिंगजी रोड, कोल्हापूर या पत्त्यावर 7 मार्च 2025 पर्यंत पाठवावेत.

मौर्या ग्लोबल यांना मशिनशॉप विभागामध्ये सीएनसी, व्हीएमसी, व्हीटीएल, एचएमसी ऑपरेटर तसेच सीएमएम ऑपरेटर अशा एकूण 46 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी सोमवार व्यतिरिक्त 09 ते 5.30 या वेळेत अर्जासह समक्ष भेटावे.

डेंटोले यांना मार्केटिंग एक्सिक्युटिव्ह, डेंटिस्ट पुरूष, स्त्री उमेदवारांची आवश्यकता आहे. एकूण 26 रिक्त पदांसाठी याठिकाणी जागा भरण्यात येणार आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी 9168253030 या क्रमांकावर संपर्क साधावा.

ओएमटी बेअरिंग प्रा. लि. एमआयडीसी शिरोली, कोल्हापूर यांना प्रोडक्शन मॅनेजर, सेल्स को-ऑर्डिनेटर, सीएनसी, एमसी, मेकॅनिकल प्रेस ऑपरेटर्स पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी prashant@omtbearing.com किंवा 937112022 यावर संपर्क करावा.

कणेरी इंडस्ट्रीज् एमआयडीसी शिरोली यांना खालील रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी hr.kaneri@kaneriautoparts.com या ईमेलवर आपले अर्ज पाठवावेत.

अविज् पब्लिकेशन, कोल्हापूर यांना मार्केटिंग मॅनेजर, सोशल मिडिया मॅनेजर, व्हीडीओ एडिटर, संपादक, उपसंपादक, कन्टेंट रायटर या पदांसाठी भरती केली जाणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी aviespublication@gmail.com किंवा अविज् पब्लिकेशन, मधुसुदन रेसिडेन्सी, महालक्ष्मी नगर, गोखले कॉलेज जवळ, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.

कोल्हापूरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक फर्ममध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर, स्टोअर किपर अशा रिक्त पदांसाठी इच्छूक व अनुभवी उमेदवारांची आवश्यकता आहे. तरी इच्छूकांनी 9421111794 या क्रमांकावर संपर्क साधावा.

जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर यांना प्रिन्सिपल पदासाठी योग्य उमेदवाराची आवश्यकता आहे.

युक्का डायग्नोस्टिक यांना पीएफएल असिस्टंट, क्यूसी केमिस्ट व लॉजिस्टिक असिस्टंट पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी 05 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखतीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.

विक्रम सोलर कंपनीला सेल्स एक्सिक्युिटिव्ह, अकाऊंटंट पदांसाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी bestsolarcompanypune@gmail.com या इमेलवर आपले अर्ज पाठवावेत.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker