Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
News

कोल्हापूरच्या सिद्धी जाधव हिची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड | Siddhi Jadhav

कोल्हापूर | छत्तीसगडमधील राजनंदगाव येथे पार पडणाऱ्या दुसऱ्या महिला व पुरुष ज्युनिअर वेस्ट झोन राष्ट्रीय स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या सिद्धी संदीप जाधव (Siddhi Jadhav) हिची पंच म्हणून निवड झाली आहे. हॉकी इंडियाच्यावतीने सिद्धीची करण्यात आली आहे. ही स्पर्धा दिनांक 21 जुलै ते 28 जुलै या कालावधीत पार पडणार आहे.

यापूर्वी सिद्धीने ग्वाल्हेर येथे झालेल्या कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत पंच म्हणून कामगिरी केली आहे. याशिवाय तिने दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत 19 व 21 वर्षांखालील मुला-मुलींच्या स्पर्धेत, मेजर ध्यानचंद अखिल भारतीय हॉकी स्पर्धा पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठीय स्पर्धा, आदी स्पर्धांमध्ये पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

या कामगिरीच्या जोरावर तिची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला हॉकी महाराष्ट्रचे अध्यक्ष कृष्णप्रकाश, सचिव मनोज भोरे, मनीष आनंद, हॉकी कोल्हापूरच्या अध्यक्षा सुरेखा पाटील, सचिव मोहन भांडवले आदींचे मार्गदर्शन लाभले.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा