Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
बातम्या

मधुरिमाराजेंची निवडणुकीतून शेवटच्या क्षणी माघार, सतेज पाटील संतापले

कोल्हापूर | कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघार घेतल्याने याठिकाणी पुन्हा नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी नगरसेवक राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण लाटकर यांच्या उमेदवारीला काँग्रेस मधूनच विरोध झाला. त्यामुळे लाटकरांची उमेदवारी रद्द करून मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली होती.

मधुरीमाराजे यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्जही भरला होता. मात्र अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सोमवारी सकाळपासूनच माजी नगरसेवक लाटकर हे नॉट रिचेबल होते. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने नाईलाजास्तव मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागल्याचे सांगितले.

लाटकर हे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांनी अर्ज मागे घेतलेला नाही. अशा परिस्थितीत आम्ही निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय घेतला असल्याचे खासदार शाहू छत्रपती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker