मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता अधिक सुलभ झाली आहे. आता तुम्ही घरबसल्या या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज डाऊनलोड करून भरू शकता. महाराष्ट्र शासनाने नुकतेच या योजनेचे फॉर्म ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करून दिले आहेत. त्याचबरोबर मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून देखील अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
राज्य सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात \’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना\’ घोषित केली. या योजनेतंर्गंत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. योजना जाहीर झाल्यानंतर योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांनी सर्वच अर्ज प्रक्रिया केंद्रांवर मोठी गर्दी केली होती. मात्र आता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुविधेमुळे, राज्यातील लाभार्थींना अर्जासाठी सरकारी कार्यालयात रांगा लावण्याची गरज भासणार नाही.
वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज कसा भरायचा:
- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म या लिंकवरून डाऊनलोड करा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा - डाऊनलोड केलेला अर्ज भरून तो तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविका, किंवा ग्रामपंचायत यांच्याकडे जमा करा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- निवास प्रमाणपत्र
- पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
महत्वाची माहिती:
- ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे.
- अधिक माहितीसाठी, तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता.
नारीशक्ती दूत App वरून अर्ज भरा / Maharashtra Nari Shakti App Login
स्टेप 1: सर्वात अगोदर नारीशक्ती दूत हे अॅप आपल्याला गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करावं लागेल. हे अॅप डाऊनलोड केल्यावर ते ओपन करा. अॅप सुरू केल्यानंतर तुमच्या स्क्रिनवर \’नारीशक्ती दूत ह्या APP मध्ये आपले स्वागत आहे.\’ असा मेसेज दिसेल
स्टेप 2: यानंतर तीन स्लाइड पुढे जाऊन Done या बटणावर क्लिक करा. त्यानंतर पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर I Accept या बटणावर क्लिक करा. त्यानंतर लॉग इन या बटणावर क्लिक करा.
स्टेप 3: लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला या अॅपमध्ये तुमचं प्रोफाइल तयार करावं लागेल. ज्यामध्ये तुमचं पूर्ण नाव, इमेल-आयडी ही माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमचा जिल्हा आणि तालुका निवडा. त्यानंतर तुमचं प्रोफाइल अपडेट करा. त्यानंतर योजना या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 4: यानंतर माझी लाडकी बहीण या योजनेचं हमीपत्र डाऊनलोड करा. त्यानंतर मुख्य पेजवर या. जिथे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे बटण दिसेल. त्यावर क्लिक करा.
स्टेप 5: त्यानंतर इथे महिलेचे नाव टाकायचं त्यानंतर महिलेच्या वडील किंवा पतीचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जन्मतारीख निवडायची आहे. जन्मतारीख निवडताना हे सुनिश्चित करा की अर्जदार महिलेचं वय हे 21 ते 65 या दरम्यान असायला हवं.
स्टेप 6: त्यानंतर तुम्हाला पुढे जिल्हा, गाव/शहर हे निवडावं लागेल. तसंच तुमचं स्थानिक स्वराज्य संस्था जी असेल ती निवडावी. पुढे पिनकोड आणि तुमचा पत्ता ही माहिती भरा. तसंच यासोबत मोबाइल नंबरही टाकावा लागेल.
स्टेप 7: पुढे तुम्हाला अशी माहिती विचारण्यात येईल की, तुम्हाला शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळतोय का याबाबत विचारणा करण्यात येईल. मिळत असेल तर हो यावर क्लिक करा. नसेल मिळत तर नाही यावर क्लिक करा.
स्टेप 8: यानंतर तुमच्या बँकेशी संबंधित माहिती भरा. ज्यामध्ये बँकेमध्ये तुमचे जे पूर्ण नाव आहे ते भरा. तसंच तुमचा बँक खाते क्रमांक आणि IFSC कोडही भरा.
स्टेप 9: यानंतर तुम्हाला काही कागदपत्रं अपलोड करावी लागतील. ज्यामध्ये तुम्हाला आधारकार्ड, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा त्याऐवजी पिवळे/केशरी रेशनकार्ड, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक हे कागदपत्र अपलोड करावी लागतील. त्यानंतर अर्जदाराचा फोटो जोडावा लागेल.
स्टेप 10: त्यानंतर Accept हमीपत्र डिसक्लेमर या बॉक्समध्ये टीक करा. त्यानंतर माहिती सादर करा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा अर्ज सब्मिट करा.


