योजना

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, एप्रिल अखेरीस २ महिन्याचे पैसे मिळणार | Ladki Bahin Yojana

₹3000 installment likely by April end; e-KYC mandatory for beneficiaries.

मुंबई | महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी ठरलेल्या ‘लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली असून, लाभार्थी महिलांना लवकरच आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो महिलांसाठी ही दिलासादायक बातमी मानली जात आहे. एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरीही हप्त्याचे पैसे खात्यात जमा न झाल्यामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र आता या चिंतेतून लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे.

सध्या अशी चर्चा सुरू आहे की, मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात. यामुळे एकूण ३००० रुपयांची रक्कम एकाच वेळी जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस हे पैसे खात्यात येऊ शकतात, अशी शक्यता असून याबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. तथापि, प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर यासंदर्भात हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

या योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळणार असून, त्यासाठी ठरवलेले निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. विशेषतः ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे ही अनिवार्य अट ठेवण्यात आली आहे. ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. मात्र, अशा महिलांना सरकारकडून आणखी एक संधी देण्यात आली आहे. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

काही महिलांनी ई-केवायसी करताना चुकीची माहिती भरल्याचे आढळून आले आहे. विशेषतः ‘कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत आहे का?’ या प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिल्यामुळे अनेक महिलांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने संबंधित महिलांना दुरुस्ती करण्याची अंतिम संधी उपलब्ध करून दिली आहे. लाभार्थींनी अधिकृत संकेतस्थळ ladkibahin.maharashtra.gov.in वर जाऊन आपली माहिती योग्य प्रकारे अद्ययावत करणे आवश्यक आहे.

महिला व बालविकास मंत्री Aditi Tatkare यांनी स्पष्ट केले आहे की, ई-केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची ही शेवटची संधी असेल. ज्या महिला पात्रतेच्या निकषात बसत नाहीत, त्यांचा लाभ कायमस्वरूपी बंद केला जाईल. त्यामुळे सर्व लाभार्थींनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ सुरू ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा