Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
Hello Kolhapur

कोल्हापुरकरांचा नादच खुळा! चक्क शाळेतच भरवला \’चिखल महोत्सव\’ | Mud Festival Kolhapur

कोल्हापूर | राधानगरी तालुक्यातील श्री शिवाजी हायस्कूल कसबा तारळे या शाळेत चक्क \’चिखल महोत्सव\’ भरवण्यात आला. राधानगरी तालुक्यात सध्या दमदार पाऊस कोसळत असून या धुवाँधार पावसातील हा आगळा वेगळा \’चिखल महोत्सव\’ चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय.

आजपर्यंत नाट्य महोत्सव, खाद्य महोत्सव, चित्रपट महोत्सव असे महोत्सव अनेकांनी पाहिले असतील. पण चिखल महोत्सव (Mud Festival Kolhapur) ही साजरा केला जातो हे सांगितलं तर आश्चर्य वाटेल. पण कोल्हापूरमधील या शाळेत चक्क चिखल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होत. यामध्ये शाळकरी मुला- मुलींनी चिखलात लोळून, उड्या मरुन हा महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केलाय.

एकीकडे मोबाईलच्या दुनियेत बालपण हरवत चालल्याची ओरड सुरू आहे. असं असताना कोल्हापूर जिल्ह्यातील या शाळेनं मात्र चिखल महोत्सवासारखा आगळावेगळा उपक्रम राबवत मातीशी असणारी नाळ घट्ट करण्याचा प्रयत्न केलाय. शालेय विद्यार्थ्यांना पावसाळ्यात कोणताही संसर्ग होऊ नये. मैदानी खेळाची सवय लागावी, या हेतूनं हा महोत्सव भरण्यात आला होता.

गेल्या चार वर्षांपासून हा चिखल महोत्सव भरवला जातोय. या महोत्सवात शालेय विद्यार्थी तहानभूक हरवून चिखलात खेळण्याचा मनमुराद आनंद लुटतात. मान्सून सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात या चिखल महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. या महोत्सवातून मैदानी क्रीडा प्रकाराला चालना मिळत असल्याचं मुख्याध्यापक एस. डी कांबळे यांनी सांगितलय. तर खो-खो, कबड्डी, फुटबॉल यासारख्या खेळांना देखील चालना मिळत असून शाळेच्या अनेक खेळाडूंनी जिल्हा आणि राज्य पातळीवर शाळेचं नाव मोठं केल्याची भावना यावेळी शिक्षकांनी व्यक्त केली.

या महोत्सवा दरम्यान विद्यार्थ्यांना मातीमधून कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून अंगावर तसेच मातीमध्ये हळद पसरण्यात आली. गोमूत्र शिंपडण्यात आले. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही या चिखल महोत्सवाचा आनंद लुटला. डीजेच्या तालावर ठेका धरत आणि चिखलात लोळत साजरा करण्यात आलेल्या या महोत्सवाची यामुळं राज्यभर चर्चा सुरू आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा