Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
Hello Kolhapur

खा. धैर्यशील माने यांची शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी निवड; कार्यकत्यांकडून जल्लोष | Dhairyashil Mane

कोल्हापूर | संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असून राज्यातील खासदार सभागृहात आपापल्या मतदारसंघातील समस्या, प्रश्न मांडताना दिसत आहेत. अशातच शिवसेना शिंदे पक्षाकडून लोकसभेत संसदीय उपनेतेपदी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने (Dhairyashil Mane) यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी निवड झाल्यानं धैर्यशील माने यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला आहे.

\"Dhairyashil

धैर्यशील माने यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी : 

धैर्यशील माने कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. या मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा ते खासदार म्हणून निवडून आले आहेत. खासदार धैर्यशील माने यांच्या नियुक्तीचं पत्र शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांकडं सादर केलं आहे. दरम्यान, शिवसेना पक्षानं धैर्यशील माने यांची उपनेतेपदी निवड करुन एका युवा खासदारावर लोकसभेची जबाबदारी सोपवली आहे.

श्रीकांत शिंदेंनंतर आता धैर्यशील माने : 

लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे 7 खासदार निवडून आलेत. या खासदारांनी केंद्रात मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची शिवसेना पक्षाच्या लोकसभेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. यानंतर आता शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने यांची निवड करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पावरील भाषणात धैर्यशील माने यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढवला होता. त्यासह संसदेत विविध प्रश्नांवर खासदार धैर्यशील माने हे विरोधकांवर तुटून पडत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे पक्षानं त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्याची माहिती दिली जात आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा