बातम्या

संतापजनक! गुप्तांगाला 28 टाके, डोके आपटले..; 5 वर्षाच्या चिमुरडीवर अमानुष बलात्कार, आई म्हणाली थेट गोळ्या घाला | MP Rape Case

MP Rape Case: मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे एका पाच वर्षाच्या चिमुरडीवर अमानुष बलात्काराची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. विशेष धक्कादायक बाब म्हणजे, अत्याचार करणारा आरोपी अल्पवयीन असून फक्त 17 वर्षांचा आहे.

चिमुरडी सध्या ग्वालियरच्या कमला राजा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, अत्याचारामुळे तिच्या गुप्तांगाला 28 टाके घालावे लागले असून कोलोस्टोमीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तिची प्रकृती अत्यंत नाजूक आहे.

घटनाक्रम: 23 फेब्रुवारी रोजी चिमुरडी बेपत्ता झाली होती. दोन तासांनंतर ती शेजाऱ्याच्या गच्चीवर बेशुद्धावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळली. प्राथमिक तपासानंतर आरोपीने दारूच्या नशेत अत्याचार केल्याचे उघड झाले. अत्याचारावेळी त्याने मुलीचे डोके भिंतीवर आपटले, तसेच तिच्या शरीरावर चावा घेतल्याच्या खुणा आढळल्या आहेत.

आईची मागणी: मुलीच्या आईने आरोपीला सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालण्याची मागणी केली आहे. कुटुंबीयांनी आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

प्रशासनाची भूमिका: पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवले आहे. स्थानिक आणि राजकीय पक्षांनी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा