बातम्या

मोठी बातमी: नराधम Dattatray Gade पोलिसांच्या ताब्यात, मध्यरात्री गावकऱ्यांच्या साथीने केली अटक

पुणे | स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) अखेर पुणे पोलिसांच्या हाती लागला आहे. गाडेला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून मध्यरात्री दीडच्या सुमारास अटक करण्यात आली.

गुनाट गावात लपलेला गाडे गावकऱ्यांनी पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. त्याच्या शोधासाठी 13 पोलिस पथकं, डॉग स्कॉड आणि ड्रोनचा वापर करण्यात आला होता. पोलिसांनी संपूर्ण गाव आणि परिसरात शोधमोहीम राबवली. अखेर, गाडे हा गावातील एका शेतात आढळून आला.

गुनाटमध्ये पोलिसांचा शोध आणि अटक

गाडेने बलात्कार करून आपल्या गावी पलायन केले होते. तो तिथे महाशिवरात्री निमित्त आयोजित कीर्तन कार्यक्रमात सहभागी झाला होता. मात्र, माध्यमांवर त्याचा फोटो झळकताच तो फरार झाला. गावातील नातेवाईकांकडून पाणी मागण्यासाठी तो एका ठिकाणी थांबला होता. त्यावेळी त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी त्याला अटक केली.

आरोपी दत्ता गाडेला शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करणार

स्वारगेट पोलिसांनी गाडेला ताब्यात घेतल्यानंतर पुण्यात आणले. सध्या त्याच्यावर लष्कर पोलीस ठाण्यात कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, दुपारी तीन वाजता त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांची प्रतिक्रिया – पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले की, आरोपी गुनाट गावात गेल्या तीन दिवसांपासून लपून बसला होता. गावकऱ्यांनी पोलिसांना सहकार्य केले. झोन 2, क्राईम टीम, ड्रोन पथक, आणि आसपासच्या जिल्ह्यांतील पोलीस पथकं या मोहिमेत सहभागी होती. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे आरोपीला पकडणे शक्य झाले.

दत्ता गाडेच्या अटकेसंदर्भातील महत्वाच्या घडामोडी

  1. आरोपी दत्तात्र गाडे हा गुनाट गावातील उसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
  2. काल दिवसभर पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून दत्तात्रय गाडेचा शोध घेतला, पण तो सापडला नाही.
  3. रात्री. 11.45 च्या सुमारास आरोपी गाडे हा एका घरात पाणी पिण्यासाठी गेला होता.
  4. तो ज्या घरात पाणी प्यायला, त्या घरातील महिलेने पोलिसांना फोन करून गाडेची माहिती दिली.
  5. पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आतच गाडेला चारही बाजूंनी घेरलं
  6. ड्रोनच्या माध्यमातून दत्ता गाडेला तू बाहेर ये, तुला घेरलंय अशी उद्घोषणा पोलिसांनी केली
  7. त्यानंतर कॅनालच्या खड्ड्यात लपलेला दत्ता गाडे हा आरोपी बाहेर आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली
  8. मध्यरात्री 1 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
  9. महिलेने पोलिसांना माहिती दिल्यानंतर तब्बल 2 तासांपेक्षीा जास्त हे सर्च ऑपरेशन सुरू होतं.
  10. गाडेला अटक करण्यासाठी पोलिसांना गुनाट गावातील ग्रामस्थांची मोठी मदत झाली.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा