Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
NewsHello Kolhapur

Kolhapur Crime News : भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत शाळकरी मुलगा ठार

पन्हाळा | आंबवडे (ता. पन्हाळा) येथे भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. शौर्य रवींद्र निगडे असे मृत मुलाचे नाव असून, गुरुवारी सायंकाळी हा अपघात घडला.

शौर्य सायंकाळी सायकलने घरी जात असताना ट्रॅक्टर चालक शिवाजी रवींद्र थोरात (वय 25, रा. बीड) याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह बेदरकारपणे चालवून त्याला जोरात धडक दिली. या अपघातात शौर्य गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर ट्रॅक्टरचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, पन्हाळा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा