Gautami Patil: चान्स मारण्यासाठी ब्लाऊजचं माप घेतोय का? सबसे कातिल गौतमी पाटीलच्या प्रश्नाने अजित कुमारला फुटला घाम! Video व्हायरल

मुंबई | नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिने आपल्या खास डान्स स्टाईलमुळे संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवली आहे. स्टेजवरचे तिचे स्फूर्तीदायक परफॉर्मन्स आणि सोशल मीडियावरचा मोठा फॅन बेस यामुळे ती नेहमी चर्चेत असते. आता ती टीव्ही मालिका विश्वात देखील आपली छाप पाडण्यास सज्ज झाली आहे.
झी मराठीवरील लोकप्रिय ‘देवमाणूस’ या मालिकेत गौतमी पाटीलची एंट्री झाली असून, तिची पहिली झलक झी मराठीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओद्वारे शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये गौतमी पाटील आणि मालिकेतील प्रमुख पात्र अजित कुमार म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड यांच्यातील रोमँटिक संवाद पाहायला मिळतो.
व्हिडीओमध्ये दाखवल्यानुसार, गौतमी पाटील ब्लाऊज शिवून घेण्यासाठी अजित कुमारकडे जाते. त्यावेळी तो तिला म्हणतो, “मी जुन्या मापांवर काम करत नाही, मी डायरेक्ट माप घेतो.” त्यावर गौतमी उत्तर देते, “काळजावर हात ठेऊन खरं सांग, माझ्यावर चान्स मारण्यासाठी माप घेतोयस ना? तुला मी कोण आहे माहिती आहे ना?” या संवादाला अजित कुमार म्हणतो, “तुम्ही कोणाची तरी बहीण आहात, कोणाची बायकोही असाल.” त्यावर गौतमी स्पष्टपणे सांगते की, “माझं अजून लग्न झालेलं नाही.”
या प्रसंगाने मालिकेतील रंगत आणखी वाढली असून, प्रेक्षकांमध्ये पुढे काय होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. झी मराठीने व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिले आहे – “सबसे कातिल गौतमी पाटील अजित कुमारची करणार का शिकार?”
‘देवमाणूस’ ही मालिका दररोज रात्री 10 वाजता झी मराठीवर प्रसारित होत असून, आता या मालिकेत गौतमी पाटील काय वळण आणते, हे पाहणे रंजक ठरणार आहे. तिच्या अभिनयाची आणि नव्या भूमिकेची झलक पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आहेत आणि कौतुकाची थाप देत आहेत.

