नोकरी

10वी, 12वी, पदवीधरांना केंद्र सरकारच्या नोकरीची सुवर्णसंधी; 2423 रिक्त जागा.. त्वरित अर्ज करा | Staff Selection Bharti 2025

Staff Selection Bharti 2025: कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत विविध शासकीय विभागांमध्ये “फेज-XIII” अंतर्गत २४२३ पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती देशभरातील केंद्र सरकारच्या विविध खात्यांमधील रिक्त जागा भरण्यासाठी होणार आहे.

शैक्षणिक पात्रता विविध पदांनुसार – Staff Selection Bharti 2025

या भरतीमध्ये मॅट्रिक, इंटरमिजिएट आणि पदवीधर अशा तीन स्तरांवरील पदांचा समावेश आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करताना पदानुसार लागणारी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक तपासावी.

पदाचा स्तरशैक्षणिक पात्रता
मॅट्रिक लेव्हल10 वी उत्तीर्ण (मान्यताप्राप्त बोर्ड)
इंटरमिजिएट लेव्हल12 वी उत्तीर्ण (मान्यताप्राप्त बोर्ड)
पदवीधर लेव्हलकोणत्याही शाखेतील पदवी (मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था)

वयोमर्यादाStaff Selection Bharti 2025

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची किमान वयोमर्यादा १८ वर्षे आहे. पदानुसार कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे:

पदाचा प्रकारकमाल वयोमर्यादा
10वी/12वी स्तरावरील पदे25 ते 27 वर्षे
पदवी स्तरावरील पदे30 वर्षे

अर्ज शुल्कStaff Selection Commission Bharti 2025

सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे. मात्र महिला उमेदवार तसेच SC, ST, माजी सैनिक (ESM) आणि दिव्यांग (PWD) उमेदवारांसाठी शुल्क माफ करण्यात आले आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया How to Apply for Staff Selection Bharti 2025

अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांनी ssc.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. सर्वप्रथम नोंदणी करून, त्यानंतर लॉगिन करणे आवश्यक आहे. “फेज-XIII/2025” या विभागात जाऊन संबंधित पोस्ट कोड निवडावा आणि आवश्यक माहिती भरावी. अर्जासोबत आपला फोटो व स्वाक्षरीही अपलोड करावी लागेल. नंतर अर्ज शुल्क भरून अंतिम सादर करणे आवश्यक आहे.

महत्त्वाची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ जून २०२५

या भरतीबाबत अधिक माहिती व पदनिहाय अटींसाठी कृपया अधिकृत वेबसाईट किंवा PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/N7IGU
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/osfDF
अधिकृत वेबसाईटhttps://ssc.nic.in/
Back to top button