महिना 65 हजार पगार: REPCO बँकेत ग्राहक सेवा सहयोगी, लिपिक पदांची भरती; त्वरित अर्ज करा | REPCO Bank Bharti 2025

REPCO Bank Bharti 2025: REPCO बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. बँकेने ग्राहक सेवा सहयोगी किंवा लिपिक या पदांसाठी तब्बल ३० जागा जाहीर केल्या आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ सप्टेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे.
या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल २८ वर्षे असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २४,०५० रुपये ते ६४,४८० रुपये या वेतनश्रेणीनुसार पगार मिळणार आहे.
अर्ज शुल्कामध्येही सवलत देण्यात आली आहे. SC, ST आणि PwBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क ५०० रुपये ठेवण्यात आले असून इतर सर्व उमेदवारांना ९०० रुपये शुल्क भरावे लागेल. अर्ज प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन असेल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी REPCO बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेली संपूर्ण जाहिरात व सूचनापत्र काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.repcobank.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ८ सप्टेंबर २०२५ आहे. या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
REPCO बँकेत नोकरी मिळविण्याची ही एक उत्तम संधी असून इच्छुकांनी विलंब न करता तातडीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भरतीसंबंधी अधिक माहिती आणि अटी-शर्ती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचावी.
REPCO Bank Bharti 2025
PDF जाहिरात | https://shorturl.at/TKFFj |
ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/Feo18 |
अधिकृत वेबसाईट | https://www.repcobank.com/ |