Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
Govt-SchemeAgriculture

Agriculture Drone : ड्रोन खरेदीसाठी मिळणार अर्थसाह्य; अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई | कृषी यांत्रिकीकरण उपअभियान २०२४-२५ अंतर्गत ड्रोन (Agriculture Drone) खरेदीसाठी अर्थसाह्य देण्यात येणार आहे. यासाठी १०० ड्रोनचा राज्याचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था तसेच कृषी व तत्सम पदवीधर लाभार्थी यांना ड्रोन अर्थसहाय्यासाठी अर्ज करता येणार आहे.

कृषी क्षेत्रात ड्रोनच्या (मानव विरहित वायू यान) वापरास पुरेशा संधी आहेत. विविध पिकांच्या वाढीच्या अवस्थेत कीटकनाशके, सूक्ष्म मूलद्रव्ये, विद्राव्य खते फवारणी या बाबी व्यतिरिक्त कृषी क्षेत्राशी निगडित इतर कामासाठी देखील ड्रोनचा वापर करता येऊ शकतो. ड्रोन वापरामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात, वेळेत व श्रमात बचत होऊन रोजगार निर्मिती होऊ शकते.

त्यामुळे केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान या योजने अंतर्गत ड्रोन या घटकाचा समावेश करण्यात आला आहे. शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था आदींना ४० टक्के अनुदान रक्कम ४ लाख, कृषी व तत्सम पदवीधर ५० टक्के अनुदान रक्कम ५ लाख, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, लहान व सिमांतिक/महिला शेतकरी यांना ५० टक्के अनुदान रक्कम ५ लाख, सर्वसाधारण शेतकरी ४० टक्के अनुदान रक्कम ४ लाख मिळू शकेल.

मार्गदर्शक सूचनेनुसार किसान ड्रोन व त्याचे संलग्न जोडणी साहित्य याची जी मूळ/वास्तविक किंमत असेल त्यापैकी जे कमी असेल ते अनुदान रक्कम देय राहील. शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था व कृषी व तत्सम पदवीधर यांनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtragov.in/Farmer या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा