नोकरी

खुशखबर: आरोग्य विभागात 1440 पदांची मोठी भरती; पात्र असाल तर मिळेल महिना 1 लाख 77 हजार पगार | Arogya Vibhag Bharti 2026

1440 Medical Officer Posts Announced in Maharashtra Public Health Department

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय क्षेत्रातील मोठी भरती जाहीर करण्यात आली असून “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या तब्बल १४४० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. राज्यातील शासकीय रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मार्च २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

या भरतीअंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ या पदासाठी उमेदवारांकडे एम.बी.बी.एस. किंवा बी.ए.एम.एस. ही शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे बंधनकारक आहे. वयोमर्यादा १८ ते ४३ वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे. शासनाच्या नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत लागू राहील.

अर्ज शुल्काबाबत अराखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००० रुपये तर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ व दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अर्ज करताना माहिती अपूर्ण किंवा चुकीची भरल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. तसेच, अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

भरती संदर्भातील मुख्य तपशील पुढीलप्रमाणे: Arogya Vibhag Bharti 2026

पदांची माहिती:

पदाचे नावपदसंख्या
वैद्यकीय अधिकारी गट-अ१४४०

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावआवश्यक पात्रता
वैद्यकीय अधिकारी गट-अएम.बी.बी.एस / बी.ए.एम.एस

वेतनश्रेणी:

पदाचे नाववेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी गट-अ56,100 – 1,77,500 रुपये

निवड प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत नमूद करण्यात आली आहे. परीक्षेचा नमुना, अभ्यासक्रम आणि इतर अटी-शर्तींबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.

राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व प्रभावी करण्याच्या दृष्टीने ही भरती महत्त्वाची मानली जात आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांसाठी ही मोठी संधी असून इच्छुकांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/IxbIg
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/CFaqu
अधिकृत वेबसाईटhttps://shorturl.at/dgkL5

Show More
Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा