Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
हॅलो कोल्हापूर

Kolhapur Crime News : नागदेववाडीत बंगला फोडला; चोरट्यांकडून दागिने, रोकडसह 2.50 लाखांचा ऐवज लंपास

Thieves target locked house in Kolhapur; CCTV captures three suspects.

Kolhapur Crime News: कोल्हापूर शहरातील नागदेववाडी परिसरात घरफोडीची गंभीर घटना उघडकीस आली असून बंद बंगल्यावर डल्ला मारत अज्ञात चोरट्यांनी सुमारे 2 लाख 33 हजार रुपयांच्या ऐवजावर हात साफ केला आहे. सनी रमेश वासुदेव (वय 35, रा. अर्चना पार्क, दत्तनगर कॉलनी) यांचा हा बंगला असून शुक्रवारी (दि. 20) पहाटे ही घटना उघडकीस आली. या प्रकरणामुळे नागदेववाडीसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सनी वासुदेव हे कुटुंबीयांसह कुरुंदवाड येथे यात्रेसाठी गेले होते. त्यावेळी घराला कुलूप लावलेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्याने प्रवेशद्वारावरील कुलूप कटावणीच्या साहाय्याने उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटाचा दरवाजा तोडून त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेली.

चोरीस गेलेल्या ऐवजाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे: वासुदेव यांच्या घरातून 28 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, 5 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, सोन्याचे लॉकेट, चांदीची लक्ष्मीची मूर्ती, जोडवी 2, तसेच रोख 5 हजार रुपये रोख असा सुमारे 2 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले.

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन संशयित चोरटे कैद झाले असून त्याआधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. नागदेववाडी परिसरातच आणखी तीन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा एकट्या घरफोडीचा प्रकार नसून चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

घरमालक सनी वासुदेव यांनी करवीर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद केली आहे. पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू असून पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा