Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
Hello Kolhapur

‘गोकुळ’ कडून पूरग्रस्‍त छावणीतील जनावरांना पशुखाद्याचे वाटप | Gokul Milk

कोल्हापूर | शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील गुरुदत्त शुगर्स यांनी सामाजिक बांधिलकीमधून पंचक्रोशीतील राजापूर, भैरववाडी, कुरुंदवाड, मजरेवाडी, अकिवाट, दानवाड आदि गावांमधील सुमारे ४०० ते ५०० जनावरे कारखान्याच्या आवारात आणि गोडाऊनमध्ये स्थलांतरीत केली आहेत. त्यांच्यासाठी गोकुळकडून आज गुरुदत्त शुगर्सच्या छावणीला आठ टन पशुखाद्य तसेच पार्वती सूतगिरणी मौजे तेरवाड येथील छावणीतील २०० जनावरांनाकरिता चार टन पशुखाद्य असे एकूण १२ मे.टन महालक्ष्मी पशुखाद्य संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व सर्व संचालक मंडळाच्यावतीने वाटप करण्यात आले.

यावेळी गोकळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, गोकुळने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली असून या भावनेतूनच महापुरामुळे ज्या जनावरांचे स्थलांतर करून जनावरांच्या छावण्या उभ्या केल्या आहेत. त्या छावणीतील जनावरांनकरिता पशुखाद्य वाटप करण्यात आले आहे. तसेच जनावरांच्या चारा कुटीसाठी ही गोकुळमार्फत लोडर चाफकटर उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले व या महापुराने अनेक मुक्या जनावरांना गुरुदत्त शुगर्स समूह तसेच पार्वती सूतगिरणीने दिलेला आधार हा मोलाचा आहे असे मनोगत व्यक्त केले.  

यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्‍वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, प्रकाश पाटील, गुरुदत्‍त शुगरचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, गुरुदत्‍त शुगरचे संचालक बबन चौगले, बाळासाहेब पाटील व रमेश बुजुगडे, जवाहर पाटील, गोकुळचे अधिकारी मानसिंग देशमुख, आर.व्ही.पाटील, अशोक पाटील, सुहास डोंगळे, गुरुदत्त शुगरचे जनसंपर्क अधिकारी विकास चौगले तसेच संस्थेचे चेअरमन, दूध उत्पादक आदि उपस्थित होते.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा