Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
NewsHello Kolhapur

गर्भलिंग निदान प्रकरणी फुलेवाडी येथील फरारी संशयित जेरबंद | Fetal Gender Detection Crime

Hello Kolhapur | कळंबा (ता. करवीर) येथील गर्भलिंग निदान प्रकरणात फरारी झालेल्या मुख्य संशयिताला करवीर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अटक केली. सुयश सुनील हुक्केरी (वय 30, रा. फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला 25 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Fetal Gender Detection Crime

कळंबा येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी मशीन घेऊन आलेला एजंट सुयश हुक्केरी, पोलिस कारवाईची चाहूल लागताच मशीनसह पसार झाला होता. त्याच्या शोधासाठी विशेष पथकाने विविध ठिकाणी छापेमारी केली; मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. शुक्रवारी पहाटे त्याला अटक करण्यात आली.

पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुक्केरीच्या चौकशीतून आणखी एका संशयिताचे नाव समोर आले आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PCPNDT Act) गर्भलिंग निदान आणि त्यासंबंधित अवैध कारवायांवर कठोर कारवाई करण्यात येते. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करून मुख्य संशयिताला अटक केली आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत. त्यामुळे अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी कठोरात कठोर शिक्षेची तरतूद होणे गरजेचे आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा