Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
Govt-Scheme

मोफत तांत्रिक प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन; 10वी, आय.टी.आय.,पदवीका, पदवी किंवा अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवार पात्र | Free Technical training

कोल्हापूर | महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे या शासनाच्या स्वायत्त संस्थेने उद्योगांसाठी आवश्यक असलेले तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या इंडो जर्मन टूल रुम (छत्रपती संभाजीनगर) या लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या भारत सरकारच्या नावाजलेल्या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे.

या प्रशिक्षणासाठी इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांनी 20 सप्टेंबर 2024 पर्यंत www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत, असे आवाहन अमृतच्या निबंधक डॉ. प्रिया देशपांडे यांनी केले आहे. या योजनेंतर्गत 15 निवासी प्रशिक्षण अभ्यासक्रम तसेच 30 अनिवासी प्रशिक्षण अभ्यासक्रम हे आय.जी.टी.आर. (छत्रपती संभाजीनगर) संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर, वाळूंज, पुणे, नागपूर, कोल्हापूर या उपकेंद्रात दिले जातील.

ही योजना खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग/संस्था/महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील 18 ते 40 वयोगटातील पात्रताधारक युवक, युवतींसाठी आहे. 10वी उत्तीर्ण तसेच आय.टी.आय.,पदवीका, पदवी उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात शिकत असलेले उमेदवार या योजनेसाठी अर्ज करु शकतात.

इच्छुक उमेदवारांचा राज्यात अधिवास असणे अनिवार्य आहे. पात्रता निकषांची पुर्तता करत योजनेचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना 6 ते 12 महिन्यांच्या कालावधीचे तांत्रिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण मिळेल. प्रशिक्षणाचे संपूर्ण शुल्क अमृत संस्था अदा करणार आहे. योजनेची सविस्तर माहिती www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची मागणी लक्षात घेऊन, रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक संधी देणाऱ्या अमृत संस्था प्रायोजित इंडो जर्मन टूल रुम (छत्रपती संभाजीनगर) संस्थेच्या विविध तांत्रिक अभ्यासक्रमांचे नि:शुल्क प्रशिक्षण अमृतच्या लक्षित गटातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी दीपक जगताप 9673714170, अनिकेत देशमुख 9665162441, आनंद निकाळजे 9325487073 किंवा अमृत कार्यालय 9730151450 यांच्याशी संपर्क साधावा.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा