भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु | Government Dr Babasaheb Ambedkar Hostel

कोल्हापूर : दसरा चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहात (Government Dr Babasaheb Ambedkar Hostel) सन २०२६-२७ करिता प्रवेश मोफत प्रक्रिया सुरू झाली आहे. इयत्ता १० वी पास व जिल्ह्यातील कोणत्याही महाविद्यालयात इयत्ता ११ वी करिता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर 15 जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत.
वसतिगृहामध्ये अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षणानुसार रिक्त जागेवर विनामुल्य प्रवेश दिला जाणार असून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोफत रहाण्याची सोय, नाष्टा, भोजन तसेच संगणक कक्ष (ई लायब्ररी), खेळ साहित्य, मनोरंजन कक्ष तसेच स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीरे, आरोग्य तपासणी व दरमहा निर्वाह भत्ता अशा अनेक सोईसुविधा विनामुल्य आहेत.
गरजू विद्यार्थ्यांनी कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टया वगळून) संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृह अधिक्षक के.आर.पांडव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. ८८५६००७४३९, ९८८१६८९७३३ व ९०२८३३३२२८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

