देश-विदेशबातम्या

IND vs PAK: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, कोहलीची ‘विराट’ खेळी ठरली गेमचेंजर; गुणतालिकेत भारत अव्वल स्थानावर

IND vs PAK: भारताने पाकिस्तानविरुद्ध ६ विकेट्सने मोठा विजय मिळवला असून, २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमधील पराभवाचा बदला घेतला आहे. या विजयासह भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश जवळपास निश्चित केला आहे. विराट कोहलीने दमदार पुनरागमन करत पाकिस्तानविरुद्ध नाबाद शतक झळकावले आणि भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

विराट कोहलीचे शानदार शतक

विराट कोहलीने १११ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद १०० धावा करत आपले ५१ वे वनडे शतक पूर्ण केले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २४२ धावांचे लक्ष्य सहज पार करत पाकिस्तानला पराभूत केले. कोहलीने विजयी चौकार लगावत भारताचा विजय निश्चित केला.

भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व

प्रथम भारतीय गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी करत पाकिस्तानला २४१ धावांवर रोखले. नंतर भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट खेळ करत सहज विजय मिळवला. दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर विराट कोहलीने जबरदस्त फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

विराट कोहलीचा नवा वर्ल्ड रेकॉर्ड

विराट कोहलीने या सामन्यात नवा विक्रम प्रस्थापित केला. तो आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १४,००० धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याची ही खेळी भारतासाठी गेमचेंजर ठरली.

गुणतालिकेत भारत अव्वल स्थानावर

या विजयासह भारतीय संघ अ गटाच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. भारताने पाकिस्तानवर मोठ्या फरकाने विजय मिळवत क्रिकेट जगतात आपली ताकद दाखवून दिली आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker