Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
बातम्याहॅलो कोल्हापूर

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी; नागपूरहून धमकीचा कॉल | Indrajit Sawant Threat News

कोल्हापूर | इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून, त्यांनी यासंदर्भातील कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सावंत यांच्यावर ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करत, नागपूरहून फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांना धमकी दिली. त्याचबरोबर माझे नाव गुगलवर शोध. ब्राह्मणांना हलक्यात घेऊन नको. ब्राह्मणांची औकात दाखवून देऊ. जिथे बोलवशील तिथे येऊ, येतो. तुझ्या घरात येऊन मारेन, असे धमकी देणारी व्यक्ती म्हणत आहे. 

या प्रकरणी प्रशांत कोरटकर यांचे नाव समोर आले असले तरी त्यांनी सर्व आरोप फेटाळले असून, आपल्याला बदनाम करण्यासाठी हा खोडसाळपणा करण्यात आल्याचा दावा केला आहे. पहिली गोष्ट तर २५ वर्षांपासून मी पत्रकारिता करतो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज असो, इतिहास असो याचा मी अभ्यास केलेला आहे. यापूर्वी इतकी जबाबदार पत्रकारिता केल्यानंतर असं मी कुणाला फोनवर धमकी देईल?”, असे प्रशांत कोरटकर म्हणाले. 

“माझं नाव वापरून कुणीतरी फोन केला. अशा प्रकारची धमकी देण्याचा प्रश्नच नाहीये. बाष्कळ धमकी देण्याचा माझा पायंडा नाही. त्यांनी ती गोष्ट माझ्याशी शहानिशा करून टाकली असती, तर बरं झालं असतं. तुम्हाला माहितीये की हल्ली एआय करून आवाजाचे मार्फिंग केले जाते. माझ्याबद्दल द्वेष बाळगणाऱ्याने हा केलेला प्रकार आहे. मी पोलिसांत तक्रार आहे की, कोणी माझ्या आवाजाची नक्कल केली आहे”, असे प्रशांत कोरटकर यांनी सांगितले. 

कॉल रेकॉर्डिंगमध्ये काय?

सदर कॉल रेकॉर्डिंगमध्ये  ‘तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना तिथे येतो… ब्राम्हणांची ताकद कमी समजू नका.. लक्षात घ्या… तुम्हाला वाटत असेल मराठमोळा महाराष्ट्र माझा.. ब्राम्हणांची ताकद काय हे महाराजांच्या अष्टप्रधानात चेक करा कोण ब्राम्हण होतं ते.. स्वतःची टीआरपी वाढवण्यासाठी काही करू नका. ब्राम्हणांची औकात काय आहे हे दाखवू’, असं म्हणत या कॉल रेकॉर्डमध्ये इंद्रजीत सावंत यांच्यावर ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करण्यात आला.

प्रशांत कोरटकर यांनी आरोप फेटाळले

प्रशांत कोरटकर यांनी आपण सावंत यांना ओळखत नसल्याचे सांगत, आपल्या नावाचा गैरवापर झाल्याचा आरोप केला आहे. याआधीही आपले फेसबुक १५ वेळा हॅक करण्यात आले असून, आपला नंबर सुद्धा हॅक झाल्याचा दावा त्यांनी केला. तसेच सावंत यांनी फेसबुक पोस्ट करण्यापूर्वी आपल्याशी संपर्क साधायला हवा होता, असे मत व्यक्त केले. ते पोलिस आणि सायबर विभागाकडे तक्रार दाखल करणार असून, सावंत यांच्यावर अब्रूनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सावंत यांचे मोठे भाष्य

या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना सावंत म्हणाले, “महाराष्ट्रात विविध जातींच्या व्यक्तींनी मुख्यमंत्रीपद भूषवले आहे, मात्र जातीय तणाव वाढवणारी विधाने याआधी कधीच झाली नव्हती. सध्या समाजात उन्माद वाढत असल्याचे दिसत आहे.” तसेच, “मी साडेतीनशे वर्षांपूर्वी नव्हतो, इतिहासाचा अभ्यास करूनच मी संभाजी महाराजांविषयी लिहिले आहे,” असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

इंद्रजीत सावंत यांची फेसबुक पोस्ट काय?

“मा. मुख्यमंत्री यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशूरामी ब्राम्हण धमक्या देत आहे. मला अशा धमक्या नवीन नाहीत, पण या xxxचे शिवरायांच्या बद्दलचे विचार किती घाणेरडे आहेत, यांच्या पोटात श्री शिव छत्रपतीं बद्दल काय विष भरलेले आहे हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावे म्हणून हे रेकॉर्डिंग व्हायरल करत आहे. या कोरटकर नावाच्या नागपूरच्या भिक्षूकालाच काय यांच्या बापालाही हा शिवरायांचा मावळा घाबरत नाही.
जय शिवराय!!!
इंद्रजित सावंत, 2
5-2-2025 , कोल्हापूर.” असे सावंत यांनी फेसबुकवर लिहिले आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker