Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
बातम्या

रोहित शर्माची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरणार! ‘या’ खेळाडूला टी20 वर्ल्ड कपसाठी संधी मिळणार

आयपीएलच्या 17 व्या हंमामाच्या 25 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) आणि मुंबई इंडियन्स दरम्यान 11 एप्रिलला सामना खेळवण्यात आला. या सामन्यात एक अशी घटना घडली ज्याची सामन्यानंतर जोरदार चर्चा झाली आहे.

बंगळुरुचा दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) फलंदाजी करत होता. स्टम्पच्या मागे मुंबई इंडियन्सचा विकेटकिपर ईशान किशन आणि स्लिपमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) उभे होते. यावेळी रोहित शर्माने दिनेश कार्तिकला उद्देशून एक वक्तव्य केलं जे स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालं. रोहित शर्माने दिनेश कार्तिकला ‘शाबाश डिके, वर्ल्ड कप खेळायचंय अजून…’ असं म्हटलं.

रोहित शर्माचं हे वक्तव्य ऐकून दिनेश कार्तिकच्या चेहऱ्यावरही हसू पसरलं. कार्तिकने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात 23 चेंडूत तब्बल 53 धावा केल्या होत्या. यावेळी दिनेश कार्तिकच्या फलंदाजीने चाहत्यांची मनं जिकंली होती. दिनेश कार्तिकने अवघ्या 35 चेंडूत 83 धावा केल्या. यात त्याने 7 षटकार आणि 5 चौकारांची बरसात केली.

दिनेश कार्तिकच्या या कामगिरीने ऋषभ पंत, संजू सॅमसन, ईशान किशन, केएल राहुल आणि जितेश शर्मा या विकेटकिपरसाठी धोक्याची घंटी वाजली आहे. टी20 वर्ल्ड कपसाठी दिनेश कार्तिक मजबूत दावेदार ठरला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही पण 38 वर्षांच्या दिनेश कार्तिकने आपल्या कामगिरीने बीसीसीआय निवड समितीला आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा