उन्हाळ्यात फोन खूप जास्त तापतो? ‘या’ टिप्स फॉलो करून तुमचा फोनला Cool ठेवा | How To Keep Phone Cool In Summer
दिवसेंदिवस उन्हाच्या झळा वाढत आहेत. त्यामुळं सर्वजण हैराण झाले आहेत. अशातच महाराष्ट्रात पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. उन्हाळ्यात आपण स्वतःची काळजी घेतोच. पण या दिवसांत आपल्या फोनचीही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कारण उन्हामुळे फोन गरम झाल्यामुळे बॅटरी फुटून अपघात होत असल्याचे समोर आले आहे.
उन्हाळ्यात फोनची काळजी कशी घ्यावी. या उष्णतेच्या काळात फोन कधी कधी खूप जास्त गरम होतो. अँड्रॉइड किंवा आयफोन दोन्ही प्रकारच्या फोन्सना ही समस्या उद्दभवते. तापमान वाढल्याने फोन ओव्हरहिट होऊ शकतो. त्यामुळं फोन स्लो होतो आणि बॅटरी लिकेजची समस्याही उद्भवू शकते. म्हणूनच तुमचा फोन सुरक्षित ठेवण्यासाठी खालील खास टिप्स तुम्हाला उपयोगी पडू शकतील.
1) फोन बॅगेत ठेवा
उन्हात बाहेर पडल्यानंतर किंवा उन्हाळ्याच्या दिवसांत फोन खिशात ठेवणे टाळा. तुमच्या शरीरातील उष्णता आणि कडक उन्हाळा यामुळं तुमचा फोन जास्त तापू शकतो. त्यामुळं फोन एकतर तुमच्या बॅगेत ठेवा किंवा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करा
2) रिस्टार्ट करा
फोन जास्त गरम झाला असेल तर थोडावेळ तो वापरु नका किंवा रिस्टार्ट करा. तसेच, फोनचे कव्हर काढून बाजूला ठेवा. त्यामुळे देखील फोन जास्त गरम होतो.
3) Airplane Mode
फोनमध्ये जास्त अॅप्स असतील तर बँकग्राउंड क्लिअर करा. गेम खेळणे, फोन करणे, बँकग्राउंडला एकापेक्षा जास्त अॅप्स असल्यास फोन स्लो होतो. तसेच, यामुळेही फोन लवकर गरम होतो. शक्य झाल्यास फोन एअरप्लेन मोडवर ठेवा.
4) कारमध्ये फोन ठेवू नका
जर तुमची कार उन्हातच पार्क केली असेल तर कारमध्ये चुकूनही फोन ठेवून जाऊ नका. पार्क केलेल्या कारमधील तापमान वाढू शकते. हे तापमान इतके असते की ओव्हरहिटमुळे फोनचा स्फोट होऊ शकतो.
5) फोन चार्जिंगची जागा
फोन चार्ज होत असताना त्याखाली उशी किंवा ब्लॅकेट काहीच ठेवू नका यामुळे फोन जास्त गरम होण्याची शक्यता आहे. फोन चार्ज करताना ती जागा थंड असेल असे पहा.
6) फोनचा ब्राईटनेस/बॅकग्राउंड
उन्हाळ्यात फोन वापरताना फोनचा ब्राईटनेस/बँकग्राउंड खूप जास्त प्रकाशमान असेल तरी देखील फोन जास्त गरम होतो त्यामुळे शक्यता फोनचे स्क्रीन बॅकग्राउंड लो करुन ठेवा.