Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
बातम्या

औरंगाबाद खंडपीठाच्या वकील संघात ॲड. ईश्वर नरोडे पाटील यांचा दणदणीत विजय!

Adv. Ishwar Narode Patil scores a landslide victory in Aurangabad High Court Bar Association elections.

छ.संभाजीनग | औरंगाबाद खंडपीठ उच्च न्यायालय वकील संघाच्या निवडणुकीत ॲड. ईश्वर दिनकर नरोडे पाटील यांनी सदस्यपदाच्या निवडणूकीत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी एकूण ९४७ मते मिळवत आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मोठे मताधिक्य मिळवले. एकूण १२६८ मतदारांपैकी ९४७ मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला.

या विजयानंतर ॲड. नरोडे पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “ही निवड केवळ माझा सन्मान नाही, तर वकील संघाकडून समाजासाठी अधिक जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काहीतरी चांगलं करण्याची मला मिळालेली संधी आहे. तसेच हा विजय माझ्या गुरुजनांचा, माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे.”

ॲड. नरोडे पाटील यांनी कमी वयात मिळालेला हा विजय त्यांच्या नेतृत्वगुणांवर आणि कार्यशैलीवर वकिलांनी दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक मानला जात आहे. समाजातील गरीब, वंचित घटकांसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा आणि त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचा या यशामध्ये मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे.

ॲड. नरोडे पाटील हे राज्य वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. अमोल शिवाजीराव सावंत यांचे कनिष्ठ सहकारी असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कायद्याच्या क्षेत्रात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker