नोकरी

40 लाखांचं पॅकेज: डिग्री, अनुभव, Resume… काहीच नको; स्टार्टअप कंपनी देतेय फ्रेशर्सना संधी, अर्ज कुठे आणि कसा करायचा.. जाणून घ्या | IT Jobs

IT Jobs: नोकरीसाठी चांगलं शिक्षण आणि उत्तम रेझ्युमे असणं आवश्यक असतं, मात्र बंगळुरुमधील एका कंपनीने या पारंपरिक गोष्टींना छेद देत नोकरीसाठी अनोखी ऑफर दिली आहे. या कंपनीला आयआयटी किंवा नामांकित कॉलेजची डिग्री, रेझ्युमे किंवा दिर्घकाळ अनुभव आवश्यक नाही, तर केवळ उमेदवाराचे कौशल्य महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे, ही एक भारतीय कंपनी असून, तब्बल 40 लाख रुपये वार्षिक म्हणजेच महिन्याला साडेतीन लाख रुपयांचा पगार देण्याची तयारी दर्शवते.

कंपनीने काय म्हटलंय? Company 40 LPA Job Posting Offer

बंगळुरुमधील ‘स्मॉलेस्ट डॉट एआय’ (Smallest.AI) ही कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनीचे संस्थापक सुदर्शन कामत यांनी ट्विटरवर ही जॉब ऑफर जाहीर केली. “आम्हाला cracked full-stack engineer हवे आहेत. प्रत्येक व्यक्तीसाठी रिअल टाइम एआय विकसित करण्यासाठी आम्हाला सक्षम अभियंते आवश्यक आहेत,” असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

या जॉब ऑफरमध्ये कायम पाच दिवसांचा वर्क वीक असणार असून, शनिवारी आणि रविवारी सुट्टी असेल. यासाठी फ्रेशर्स तसेच दोन वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज कसा करायचा?

इच्छुक उमेदवारांनी केवळ 100 शब्दांमध्ये स्वतःचं इंट्रोडक्शन लिहून आणि आपल्या कामाचा एक छोटा नमुना पाठवून अर्ज करायचा आहे. ही माहिती आणि नमुना info@smallest.ai या ईमेल आयडीवर पाठवावा. या अनोख्या ऑफरमुळे अनेक तांत्रिक क्षेत्रातील उमेदवारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

कंपनीच्या या अनोख्या पद्धतीबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. काहींनी याचा LinkedIn शी तुलना केली आहे, तर काहींनी रेझ्युमेपेक्षा कौशल्याला प्राधान्य देणं ही चांगली संकल्पना असल्याचं म्हटलं आहे. काही तज्ज्ञांनी भविष्यात अशाच प्रकारे नोकऱ्या दिल्या जातील, असं भाकीत वर्तवलं आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker