कोल्हापूर सर्किट बेंच आतून आहे तरी कसं? अत्याधुनिक कोर्ट रुमची पहिली झलक खास हॅलो कोल्हापूरच्या वाचकांसाठी | Kolhapur Circuit Bench

कोल्हापूर | मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे (Kolhapur Circuit Bench) उद्घाटन आज भारताचे मा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे.. या सर्किट बेंचमुळे कोल्हापूरसह सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांतील नागरिकांना जलद आणि सुलभ न्याय मिळेल.
सर्किट बेंच सीपीआरसमोरील दीडशे वर्षांपूर्वी 1874 मध्ये बांधलेल्या आणि कौटुंबिक न्यायालयासाठी वापरात असलेल्या इमारतीमध्ये सुरु होत आहे. या इमारतीचा व न्यायालयाच्या परिसराचा अवघ्या 25 दिवसात कायापालट करण्यात आला आहे. सर्किट बेंचच्या अत्याधुनिक कोर्ट रुमची पहिली झलक खास हॅलो कोल्हापूरच्या वाचकांसाठी..

देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये यांच्या अध्यक्षतेखाली आज (17 ऑगस्ट) कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होत आहे.

या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह सहा जिल्ह्यातील वकीलही आणि नागरिक मोठ्या उपस्थित असणार आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच सीपीआरसमोरील दीडशे वर्ष जुन्या इमारतीमध्ये सुरु होत आहे.

या जुन्या इमारतीचा गेल्या 25 दिवसांत संपूर्ण कायापालट करण्यात आला असून इमारतीला अत्याधुनिक स्वरूप देण्यात आले आहे.

या इमारतीत अत्याधुनिक पद्धतीने कोर्ट रुम तयार करण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर सर्किट बेंचचे आज लोकार्पण झाल्यानंतर उद्यापासून (18 ऑगस्ट) प्रत्यक्ष कामाकाजाला सुरुवात होणार आहे. यासाठी खटलेही वर्ग करण्यात आले आहेत.
