बातम्याहॅलो कोल्हापूर

Kolhapur Circuit Bench : ४० वर्षांच्या लढ्याला यश, उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ ‘या’ तारखेपासून सुरु होणार

After 40 Years of Struggle, Mumbai High Court's Circuit Bench to Begin in Kolhapur from August 18th 2025

कोल्हापूर | अखेर ४० वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला यश मिळाले असून, मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच (Kolhapur Circuit Bench) कोल्हापुरात १८ ऑगस्ट २०२५ पासून कार्यान्वित होणार आहे. या निर्णयाची अधिकृत अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांनी जारी केली असून, याबाबतची माहिती खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. व्ही. आर. पाटील यांनी दिली आहे.

सर्किट बेंचच्या मान्यतेमुळे कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, तसेच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत मुंबई किंवा औरंगाबादला जावे लागणाऱ्या नागरिकांना, वकिलांना व न्यायप्रविष्ट व्यक्तींना आता कोल्हापुरातच न्याय मिळणार आहे.

या निर्णयामागे अनेकांची मेहनत असून, खासदार छत्रपती शाहू महाराज यांची भूमिका विशेष महत्त्वाची ठरली आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची सदिच्छा भेट घेऊन सर्किट बेंचच्या अनुषंगाने मुद्देसूद चर्चा केली होती. कोल्हापुरात सर्किट बेंच का आवश्यक आहे, याविषयी त्यांनी सविस्तर माहिती देत आग्रह व्यक्त केला होता की, “आपल्या कारकिर्दीतच हे बेंच सुरू व्हावे”.

दरम्यान, आमदार अमल महाडिक यांनी याआधीच संकेत दिले होते की अधिसूचना लवकरच जाहीर होणार असून, शेंडा पार्क किंवा कृषी महाविद्यालय परिसरातील जागेचा निर्णय १५ दिवसांत होईल.

खंडपीठाच्या स्थापनेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध स्तरांवर आंदोलनं झाली. वकिल, सामाजिक संघटना, राजकीय नेते आणि स्थानिक नागरिकांनी यासाठी सातत्याने आवाज उठवला. आता अखेर या लढ्याला यश लाभले असून, कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू होणार असल्याने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील लाखो जनतेला याचा थेट फायदा होणार आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker