Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
NewsHello Kolhapur

Kolhapur: शिक्षकानेच काढली विद्यार्थीनींची छेड, जमावाने दिला बेदम चोप; याआधीही अशाच प्रकरणात गावभर काढली होती धिंड

कोल्हापूर | Kolhapur जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील शाळेत विद्यार्थिनीशी अशोभनीय वर्तन करून छेड काढल्याप्रकरणी सहाय्यक शिक्षक नसीर मुल्ला याला पालक व गावकऱ्यांनी शाळेच्या आवारातच बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

ही घटना समजताच परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली. पालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. याप्रकरणी स्थानिक आमदार हसन मुश्रीफ यांनी तात्काळ लक्ष घालून संबंधित शिक्षकाला अटक करून कारवाईचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानुसार, संबंधित शिक्षकाचे तत्काळ निलंबन करण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नसीर मुल्ला हा शिक्षक यापूर्वी मुरगुड येथील शाळेतही अशाच प्रकारात दोषी ठरलेला होता. त्यावेळी देखील पालक व ग्रामस्थांनी त्याला चांगलाच धडा शिकवून शहरातून धिंड काढली होती. मात्र, यातून कोणताही बोध न घेता त्याने पुन्हा तेच वर्तन केले.

या घटनेनंतर संपूर्ण गाव आणि तालुक्यात संताप व्यक्त करण्यात येत असून, पालकांनी शाळा प्रशासन आणि शिक्षण विभागाकडून अधिक कडक धोरणे राबवण्याची मागणी केली आहे. शाळा हे सुरक्षिततेचे ठिकाण असावे, अशी भावना पालकांतून व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत शिक्षक नसीर मुल्ला याला ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी सुरू आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा