Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
NewsHello Kolhapur

Kolhapur Crime: लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या क॥बावड्यातील तरूणीचा शिवाजी पेठेतील तरूणाकडून खून

कोल्हापूर | सरनोबतवाडी परिसरात दि. ३ रोजी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या तरुणाने आपल्या प्रेयसीचा चाकू खुपसून खून केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत समीक्षा भरत नरसिंगे (वय २३, रा. दत्त मंदिर, जय भवानी गल्ली, कसबा बावडा) या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सतीश यादव (रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याने दुपारी सुमारे दोनच्या सुमारास समीक्षाच्या छातीत चाकू खुपसला. विशेष म्हणजे चाकू तरुणीच्या बरगडीत अडकलेला होता, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

समीक्षा व सतीश हे दोघेही एका खासगी इव्हेंट कंपनीत काम करत होते. एकमेकांशी जवळीक वाढल्याने ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. सतीशने समीक्षाकडे लग्नासाठी आग्रह धरला होता, पण तिच्याकडून नकार मिळाल्यानंतर रागाच्या भरात त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, असे समजते.

घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पुढील तपास कोल्हापूर शहर पोलिस करीत आहेत.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा