Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
हॅलो कोल्हापूर

कोल्हापूर महापालिका हद्दवाढीस विरोध; शिरोली पुलाची, नागांव, शिये गावातील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यवहार शंभर टक्के बंद! Kolhapur News

कोल्हापूर | कोल्हापूर महापालिका प्रस्तावीत हद्दवाढीस विरोध दर्शवण्यासाठी सर्वपक्षीय हद्दवाढ विरोधी कृती समितीने पुकारलेल्या गावबंदमध्ये शिरोली पुलाची, नागाव, शिये गावातील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यवहार शंभर टक्के बंद ठेवण्यात आले.

कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढीत हातकणंगले आणि करवीर तालुक्यातील सुमारे 19 गावांचा समावेश करण्यात आला आहे. पण महानगरपालिका कोल्हापूर शहरात नागरीकांना अत्यावश्यक सेवा सुविधा देण्यात अपयशी ठरली आहे. फक्त महसूल गोळा करण्याच्या उद्देशाने हद्दवाढीचा घाट घातला जात आहे. त्यामुळे आम्ही ग्रामपंचायत फंडातून सर्व नागरी सेवा सुविधा देण्यास सक्षम आहोत.

त्यामुळे या हद्दवाढीला विरोध करण्याचा निर्णय शिरोली पुलाची, नागाव आणि शिये गावानी बंद ठेवून हद्दवाढीला तिव्र विरोध केला आहे. आज रविवारी संपूर्ण गावबंदमध्ये सहभागी झालेले नागरिक, व्यावसायिक, व्यापारी, लहान मोठे उद्योजक या सर्वांचे शिरोली सरपंच पद्मजा करपे तसेच नागाव सरपंच विमल शिंदे यांनी आभार व्यक्त केले.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker