Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
Govt-Scheme

लेक लाडकी योजनेतून मुलीसाठी 1 लाख रुपये कसे मिळवायचे? अर्ज कुठे आणि कसा करायचा? वाचा सविस्तर.. | Lek Ladki Yojana

महाराष्ट्रात 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत 1 लाख 1 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Govt) मुलींच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी लेक लाडकी (Lek Ladki Yojana) योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत एकूण 1 लाख 1 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.

योजनेचे उद्दिष्टे:

  • मुलींच्या जन्माचा दर वाढवणे
  • मुलींचे शिक्षण आणि विकासाला प्रोत्साहन देणे
  • बालविवाह आणि कुपोषण कमी करणे
  • मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे

लाभार्थी:

  • 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुली
  • पिवळ्या किंवा केशरी राशन कार्ड असलेल्या कुटुंबातील मुली
  • एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुली (दुसऱ्या मुलीसाठी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र आवश्यक)
  • जुळी मुली असल्यास दोन्ही मुलींना लाभ मिळेल

लेक लाडकी (Lek Ladki Yojana) या योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर 6 हजार रुपये, सहावीत गेल्यावर 7 हजार रुपये, 11 वीत गेल्यावर 8 हजार रुपये, 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस 1 लाख 1 हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे.

शासनामार्फत थेट लाभार्थी हस्तांतरण (DBT) द्वारे लाभाची रक्कम  लाभार्थ्यांना अदा करण्यात येणार आहे. 1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना त्याच प्रमाणे 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास 1 मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता, पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.

अर्ज कुठे व कसा करायचा?

तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेसाठीचा अर्ज करायचा आहे.

अर्जाचा नमुना खालच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल. याच फॉरमॅटमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. योजनेसाठीच्या शासन निर्णयात हा फॉरमॅट देण्यात आला आहे. एका साध्या कागदावर लिहून तुम्ही हा अर्ज करू शकता.

\"लेक
फोटो कॅप्शन,लेक लाडकी योजनेसाठीच्या अर्जाचा नमुना

यात तुमची वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, मोबाईल नंबर, अपत्यांची माहिती, बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. तारीख, ठिकाण टाकून सही करायची आहे.

अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडून पोहोच पावती घ्यायची आहे.

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे

  • लाभार्थीचा जन्माचा दाखला
  • कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.)
  • लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहिल.)
  • पालकाचे आधार कार्ड
  • बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
  • रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत),
  • मतदान ओळखपत्र
  • शाळेचा दाखला
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र

अर्ज केल्यानंतर पुढे काय?

अंगणवाडी सेविकेकडे योजनेसाठीचा अर्ज व कागदपत्रे नीट तपासून घेतली की त्याची नोंदणी सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर करावी लागणार आहे. त्यानंतर तो अर्ज संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे पाठवाला जाईल. प्रशासकीय यंत्रणेकडून 2 महिन्याच्या आत अर्जावर कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर लाभार्थी निश्चित झाले की शासनामार्फत लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांना बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

Back to top button

Adblock Detected

पोस्ट वाचण्यासाठी Ad Blocker बंद करा