Life Insurance Corporation Bharti 2025: एलआयसी अंतर्गत 841 पदांची मेगाभरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी

Life Insurance Corporation Bharti 2025: जीवन विमा महामंडळ (LIC) मुंबईतर्फे मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सहायक प्रशासकीय अधिकारी आणि सहाय्यक अभियंता या पदांसाठी एकूण 841 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
या भरतीत 760 जागा सहायक प्रशासकीय अधिकारी पदासाठी तर 81 जागा सहाय्यक अभियंता पदासाठी राखीव आहेत. शैक्षणिक पात्रतेनुसार, सहायक प्रशासकीय अधिकारी पदाकरिता संबंधित क्षेत्रातील पदवी आवश्यक आहे, तर सहाय्यक अभियंता पदाकरिता AICTE मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.टेक./बी.ई. (सिव्हिल) पदवी अपेक्षित आहे.
Life Insurance Corporation Bharti 2025
उमेदवारांचे वय अर्जाच्या तारखेप्रमाणे किमान 21 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. अर्ज शुल्क SC, ST आणि PwBD उमेदवारांसाठी 85 रुपये असून इतर प्रवर्गासाठी 700 रुपये इतके आहे. या भरतीसाठी कामाचे ठिकाण मुंबई असेल.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावरील नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून, आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज फक्त licindia.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच स्वीकारले जाणार आहेत.
PDF जाहिरात -1 | https://tinyurl.com/4bcchpzb |
PDF जाहिरात -2 | https://tinyurl.com/39chaunr |
ऑनलाईन अर्ज करा | https://tinyurl.com/27wyzbke |
अधिकृत वेबसाईट | licindia.in |