बातम्याहॅलो कोल्हापूर

कोल्हापुरकरांच्या लढ्याला यश! महादेवी हत्तीण कोल्हापुरात परतणार, वनताराच्या सीईओंची मोठी घोषणा! Mahadevi Elephant

कोल्हापूर | नांदणी मठातील महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीच्या (Mahadevi Elephant) परतीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. वनताराच्या टीमने दुसऱ्यांदा कोल्हापूरमध्ये येत नांदणी मठाच्या प्रमुख स्वामींसोबत विशेष बैठक घेतली. ही बैठक कोल्हापूरमधील जैन बोर्डिंगमध्ये पार पडली. यावेळी वनताराचे सीईओ विहान करनी, नांदणी मठाचे भट्टारक पट्टाचार्य जीनसेन महाराज, माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार राहुल आवाडे यांची उपस्थिती होती. बैठकीदरम्यान परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वनताराचे सीईओ विहान करनी यांनी कोल्हापूरकरांची व नांदणी मठाची दिलगिरी व्यक्त केली. माधुरी हत्ती कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेच्या भावना आणि श्रद्धेचा विषय असल्याचे सांगत त्यांनी दिलासा दिला की, “हत्तीला लवकरात लवकर कोल्हापुरात परत आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्र सरकार, नांदणी मठ आणि वनतारा एकत्रितपणे न्यायालयात जाऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत.”

स्वतः नांदणी मठाचे प्रमुख जीनसेन महाराज यांनी देखील संवाद साधताना सकारात्मक भूमिका घेतली. त्यांनी सांगितले, “वनतारा प्रशासनाने हत्तीणीच्या पुनरागमनासाठी सहकार्याचे आश्वासन दिले असून, तिची काळजी योग्य पद्धतीने घेतली जाईल, असा विश्वास आम्हाला दिलेला आहे. आम्ही अनंत अंबानी आणि वनतारा टीमचे आभार मानतो.”

दरम्यान, माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी कोल्हापूरकरांच्या संघर्षाचे कौतुक केले. “महादेवी हत्तीच्या परतीसाठी कोल्हापूरकरांनी एकजुटीने आवाज उठवला. सोशल मीडियावरून जनतेच्या भावना व्यक्त झाल्या, स्थानिक नेत्यांनीही पुढाकार घेतला. या लढ्याला यश आले आणि अखेर कोल्हापूरकर ‘हिंदकेसरी’ ठरले,” असे ते म्हणाले.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker