Jannah Theme License is not validated, Go to the theme options page to validate the license, You need a single license for each domain name.
बातम्या

मोठी बातमी! मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीत उडी, निवडक ठिकाणी उमेदवार देणार; विधानसभेसाठी तीन कलमी कार्यक्रम केला जाहीर

Maharashtra Assembly Elections 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडायचे की लढवायचे याचा निर्णय घेण्यासाठी आज अंतरवाली सराटी येथे निर्णायक बैठक पार पडली. यात मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली.

जालना | मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) उडी घेतली आहे. त्यामुळे प्रस्थापितांना धक्का बसला आहे. मराठा आरक्षणासाठी (Marathi Reservation) आंदोलन करणारे जरांगे यांनी आज (20 ऑक्टोबर) मराठा समाजासासमोर आपली भूमिका स्पष्ट केली असून वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी त्यांनी उमेदवारांना अर्ज भरायला सांगितले आहेत. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या रणनीतीसाठी तीन महत्त्वाचे मुद्दे मराठा समाज्यासमोर मांडले आहेत. याच तीन मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवूनच जरांगे निवडणूक लढवणार आहेत. 

समीकरण न जुळल्यास सर्वांना पाडणार

मनोज जरांगे यांनी मराठा समजाला संबोधित करत विधानसभा निवडणुकीसाठी आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी विधानसभा निवडणूकीत आपले उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करा असे निर्देश दिले आहेत. सोबतच उमेदवारी अर्ज दाखल करताना नेमकी काय रणनीती असेल? याबाबतही जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ज्या मतदारसंघातून उमेदवार निवडून येण्याची शक्यता असेल, त्याच जागेवर जरांगे उमेदवार देणार आहेत. या निवडणुकीसाठी हा पहिला निकष असेल. सोबतच राज्यात जो मतदारसंघ राखीव आहे, त्या जागेसाठी जारांगे उमेदवार देणार नाहीत. एससी किंवा एसटी उमेदवार जो आपल्या विचाराचा असेल त्यांना साथ देऊन निवडून आणू सोबतच तिसरा निकष म्हणून जिथे उमेदवार उभा केला जाणार नाही, तिथे उभ्या राहिलेल्या उमेदवाराकडून 500 रुपयांच्या बाँडवर लिहून घेतले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जो मराठा आरक्षणाच्या भूमिकेला समर्थन देईल, त्यालाच मतदान द्या, असं जरांगे यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणात बोलताना विधानसभा निवडणुकीची रणनीती सांगितली आहे. आपण उमेदवार देत असू तर विजयाचे समीकरण साधावे लागेल. माझे त्यासाठी बोलणे चालू आहे. सोबतच जो आपल्या विरोधात भूमिका घेईल त्याला पाडायचंच आहे, असं जरांगे यांनी मराठा सामजाला उद्देशून म्हटलं आहे.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker