बातम्या

मोठी बातमी : भाजपची पहिली यादी जाहीर, पहिल्या यादीत कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक, तर इचलकरंजीतून राहुल आवाडेंना उमेदवारी

मुंबई | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल आता खऱ्या अर्थानं वाजलं आहे. कारण भाजपने आज अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपकडून पहिल्या यादीत 99 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यादीमध्ये कोल्हापूर दक्षिणमधून माजी आमदार अमल महाडिक, तर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे

नव्यांना संधी देताना काही जणांची तिकीटही कापण्यात आली आहेत. तर अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी देण्यात आल्याचंही दिसत आहे. भोकरमधून खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. कल्याणमधून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर कामाठीमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपची पहिली उमेदवार यादी 

नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस
कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
शहादा – राजेश पाडवी
नंदूरबार- विजयकुमार गावीत
धुळे शहर – अनुप अग्रवाल
सिंदखेडा – जयकुमार रावल
शिरपूर – काशीराम पावरा
रावेर – अमोल जावले
भुसावळ – संजय सावकारे 
जळगाव शहर – सुरेश भोळे 
चाळीसगाव – मंगेश चव्हाण
कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
इचलकरंजी – राहुल आवाडे

जामनेर -गिरीश महाजन 
चिखली -श्वेता महाले 
खामगाव – आकाश फुंडकर 
जळगाव (जामोद) – संजय कुटे 
अकोला पूर्व – रणधीर सावरकर
धामगाव रेल्वे – प्रताप अडसद 
अचलपूर – प्रवीण तायडे 
देवली – राजेश बकाने 
हिंगणघाट – समीर कुणावार 
वर्धा – पंकज भोयर 
हिंगना – समीर मेघे 
नागपूर दक्षिण – मोहन माते 

नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे
तिरोरा – विजय रहांगडाले 
गोंदिया – विनोद अग्रवाल 
अमगांव – संजय पुरम
आर्मोली – कृष्णा गजबे 
बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार 
चिमूर – बंटी भांगडिया 
वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार 
रालेगाव – अशोक उडके 
यवतमाळ – मदन येरवर 
किनवट – भीमराव केरम 
भोकर – श्रीजया चव्हाण 
नायगाव – राजेश पवार 
मुखेड – तुषार राठोड 

https://twitter.com/PTI_News/status/1847941365482615272
Back to top button