बातम्या

Motorola Edge 50 वर जबरदस्त सवलत! 28 हजारचा मोबाईल मिळतोय फक्त 15 हजारांत..!

Motorola Edge 50: स्मार्टफोन बाजारात सध्या मोठी स्पर्धा रंगली असून, अनेक ब्रँड्स ग्राहकांच्या लक्षवेधी ऑफर्ससह सज्ज आहेत. याच दरम्यान, Motorola ने आपल्या लोकप्रिय Edge 50 स्मार्टफोनवर जबरदस्त सवलत जाहीर केली आहे. फ्लिपकार्टवर ही खास ऑफर सुरू असून, एक्सचेंज आणि बँक ऑफरनंतर हा प्रीमियम स्मार्टफोन फक्त ₹15,500 मध्ये खरेदी करता येणार आहे.

दमदार फीचर्ससह प्रीमियम लुक

Motorola Edge 50 हा मिडरेंज फ्लॅगशिप स्मार्टफोन असून, यामध्ये 6.7 इंचाचा P-OLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. स्क्रीनचे रक्षण Corning Gorilla Glass 5 करते, तर IP68 सर्टिफिकेशन असल्यामुळे फोन पाणी आणि धूळ यांच्यापासून सुरक्षित राहतो.

हा स्मार्टफोन Android 14 वर चालतो आणि भविष्यातील अपडेट्ससह येतो. त्यात Snapdragon 7 Gen 1 AE प्रोसेसर, 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज अशा पॉवरफुल स्पेसिफिकेशन्स आहेत, जे गेमिंगपासून मल्टीटास्किंगपर्यंत सगळ्या गरजा सहज पूर्ण करतात.

कॅमेरा आणि बॅटरीमध्येही आघाडीवर

फोटोग्राफीसाठी Motorola Edge 50 मध्ये 50MP + 10MP + 13MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप असून, 32MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. डे-टू-नाईट फोटोग्राफीसाठी हे कॅमेरे उत्कृष्ट कामगिरी करतात. त्यासोबतच, 5000mAh बॅटरी आणि 68W फास्ट चार्जिंग मुळे दिवसभर वापरासाठी कुठलीही अडचण भासत नाही.

Flipkart वर खास डील

Motorola Edge 50 ची मूळ किंमत ₹32,999 असून, फ्लिपकार्टवर सध्या 33% सवलतीनंतर ₹21,999 मध्ये उपलब्ध आहे. शिवाय, Flipkart Axis Bank कार्ड वापरल्यास 5% कॅशबॅक मिळतो. हा फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज अशा पॉवरफुल स्पेसिफिकेशन्ससह उपलब्ध आहे

याशिवाय, एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहक जुन्या फोनच्या बदल्यात ₹21,450 पर्यंतचे एक्सचेंज व्हॅल्यू मिळवू शकतात. जर तुमच्या जुन्या फोनला ₹6,000 पर्यंतचे मूल्य मिळाले, तर हा नवा प्रीमियम फोन फक्त ₹15,500 मध्ये मिळू शकतो.

Edge 60 येण्यापूर्वीची संधी

Motorola लवकरच आपला नवीन Edge 60 मॉडेल सादर करणार आहे. त्यामुळे कंपनी Edge 50 वर सवलत देत असून, हे मॉडेल विकत घेण्याची ही एक उत्तम वेळ आहे. प्रीमियम डिझाईन, उत्कृष्ट कॅमेरे आणि पॉवरफुल परफॉर्मन्स शोधत असणाऱ्यांसाठी Motorola Edge 50 सध्या उपलब्ध असलेली सर्वोत्कृष्ट डील ठरू शकते.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker