MPSC गट क, दुय्यम निरीक्षक पदांची भरती जाहीर, नवीन जाहिरात प्रकाशित | MPSC Group C Bharti 2025

MPSC Group C Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) गट-क सेवांच्या अंतर्गत दुय्यम निरीक्षक पदाच्या १३७ रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२५ असून, उमेदवारांनी ती लक्षात घेऊन वेळेत अर्ज सादर करावा.
ही भरती गट-क पूर्व परीक्षेमार्फत करण्यात येणार असून, अर्ज करण्याची प्रक्रिया फक्त ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच https://mpsconline.gov.in या पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करण्याआधी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. आधीच खाते असलेल्या उमेदवारांनी आपल्या खात्याची माहिती अद्ययावत करणे गरजेचे आहे.
दुय्यम निरीक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार ठरवण्यात आली असून त्यासाठीची सविस्तर माहिती आयोगाच्या मूळ जाहिरातीत दिली आहे. त्यामुळे उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून आणि परीक्षा शुल्क भरून आपला अर्ज सादर करावा. अन्यथा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
परीक्षा शुल्क सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. ७१९, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी रु. ४४९ इतके निश्चित करण्यात आले आहे. हे शुल्कही ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे.
या परीक्षेच्या आणि भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यासोबतच सविस्तर मार्गदर्शक सूचना आणि जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करण्यात आली आहे.
उमेदवारांनी वेळ वाया न घालवता, आवश्यक कागदपत्रांसह आपले खाते तयार करून अर्ज प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
| Advertisement | Read PDF |
| Online Application Link | Apply Online |
| Official Website | Official Website |

