बातम्या

शरद पवारांना मोदींनी खुर्चीवर बसवले, नंतर ग्लासमधून पाणी दिले; राजकीय गुरूंना दिलेल्या वागणूकीने उपस्थितांची मने जिंकली | Sharad Pawar – PM Modi

नवी दिल्ली | ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (marathi sahitya sammelan 2025) उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींच्या एका कृतीने सर्वांचे मन जिंकले.

समारंभादरम्यान शरद पवार यांना बसण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आदराने खुर्ची ओढून दिली आणि स्वतःच्या हाताने बाटलीतून ग्लासमध्ये पाणी ओतून त्यांना दिले. या प्रसंगाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

पंतप्रधान मोदी दीपप्रज्वलन करून उद्घाटन करणार होते, मात्र त्यांनी शरद पवार यांनाही दीपप्रज्वलनात सहभागी होण्याची विनंती केली. त्यानंतर शरद पवार यांनी भाषण दिले आणि आपल्या जागेवर बसण्यासाठी आले असता, मोदींनी पुन्हा त्यांना मदत केली.

भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले की, शरद पवार यांच्या निमंत्रणावरूनच त्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यास सहमती दर्शवली. “शरद पवारजी यांच्या निमंत्रणावरूनच मला या गौरवशाली परंपरेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे,” असे मोदी म्हणाले.

या कार्यक्रमात मराठी साहित्य, संस्कृती आणि भाषेच्या जतनाविषयी चर्चा झाली. संमेलनात विविध मान्यवर उपस्थित होते.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker