नोकरी

बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी पुणे मर्चंट्स बँकेत नोकरी! 10 वी ते पदवीधरांना मिळेल संधी | Pune Merchants Co-Operative Bank Recruitment 2024

पुणे मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया (Pune Merchants Co-Operative Bank Recruitment 2024) सुरू आहे. बँकेने मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखाधिकारी आणि शिपाई/ड्रायव्हर या पदांसाठी 20 रिक्त जागा भरण्याची घोषणा केली आहे.

पात्र उमेदवारांनी ऑफलाईन किंवा ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने 20 दिवसांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे.

Pune Merchants Co-Operative Bank Recruitment 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यालय : २५७, बुधवार पेठ, श्री शिवाजी रोड, श्रीमंत दगडुशेठ गणपती मंदिरासमोर, पुणे ४११००२
ई-मेल पत्ता – career@pmcbl.com

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.बँकिंग क्षेत्रातील सिनियर पदाचा कमीत कमी ८ वर्षाचा अनुभव आवश्यक
सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.बँकिंग क्षेत्रातील अकौंट विभाग/कर्ज विभाग/गुंतवणूक विभाग इ. चा कमीत कमी ५ वर्षाचा अनुभव आवश्यक.
शाखाधिकारीमान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.पदव्युत्तर पदवी तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थांची (ICM, IIBF, VAMNICOM इ.) बैकिंग / सहकार / कायदेविषयक पदविका सहकारी बँकेतील किमान ५ वर्षाचा ऑफीसर / शाखाधिकारी पदाचा अनुभव आवश्यक.MS-CIT/समतुल्य प्रमाणपत्र आवश्यक.
शिपाई/ड्रायव्हर१० वी उत्तीर्ण, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक. तीन चाकी/चार चाकी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक.

वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 दिवस पर्यंत आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात – Pune Merchants Co-operative Bank Job 2024
अधिकृत वेबसाईट – https://www.pmcbl.com/

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker