ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी | NTPC Recruitment 2024
नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवरांसाठी ही चांगली संधी आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ वाया न घालवता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. एनटीपीसी म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड ( NTPC Recruitment 2024) यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
या भरती प्रक्रिये अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदांसाठी शिक्षण आणि वयाची अट पदानुसार वेगवेगळी आहे. ही भरती प्रक्रिया एकूण 64 रिक्त जागांसाठी राबवली जात आहे. यासाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यामुळे तुम्ही कोणत्याही ठिकाणावरून सहजरित्या अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 500 रूपये फीस ही लागणार आहे.
इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 30 पर्यंत असावे. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही https://ntpcrel.co.in/ या साईटला भेट देऊ शकता. याठिकाणी तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची अधिक आणि सविस्तर माहिती मिळेल.
या भरती प्रक्रियेसाठी आपण NTPC Recruitment 2024 या लिंकवरून थेट अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 एप्रिल 2024 आहे. उशीरा प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी.


